पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे ओबीसी समाजाचे आहेत; असे सांगुन सातत्याने भारतीय जनता पक्षाने या देशातील जनतेची आणि ओबीसी बांधवांची मते लुटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसीचे पंतप्रधान आहे, असे भाजपकडून सातत्याने सांगितले जात आहे. मात्र काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण माहिती काढण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी (PM Narendra Modi not OBC) नाहीत.आणि हे आम्ही देशपातळीवर जाहीर (soon announce with proof) करू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.
ओबीसी समाजाचा फुटबॉल केला जातोय : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागच्या वतीने, 'पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता मंथन' शिबिराचे आयोजन काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसी समाजाची जातनिहाय गणना ही केंद्रानेच केली पाहिजे, राज्याने नव्हे. आज जे ओबीसी समाजाला फुटबॉल केले जात आहे, ते करू नये. केंद्र सरकारने जे संविधानात आहे, ते केंद्र सरकारने देश भरात लागू करावे. ही मागणी महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाची आहे, असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.
फडणवीसांना टोला : काल राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितल आहे की, औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र हा गुजरात पेक्षा पुढे जाणार आहे. माझे ते अत्यंत जवळचे मित्र आहे. ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा, 2014 ते 19 साली किती प्रोजेक्ट हे गुजरातला गेले हे त्यांनी जाहीर करावे. ते राज्याचे डीजी होते, त्यांना आत्ता भाजपने डीसीपी केले आहे. आमच्या मित्राचा एक प्रकारे अपमान झाला आहे,असा टोला देखील यावेळी पटोले यांनी फडणवीस यांना लगावला. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचे काहीही कारण नाही; कारण ते आत्ता नाचगाण्यात व्यस्त आहे, असा टोला देखील यावेळी पटोले यांनी लगावला.
समविचारी पक्षांना निमंत्रण : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या देशभरात भारत जोडो यात्रा सुरू आहे. ती यात्रा राजकीय यात्रा नाही.आज राहुल गांधी हे पक्षासाठी नव्हे; तर देशासाठी निघाले आहे. ज्यांना देशाच्या बरोबर राहायचे असेल त्यांना निमंत्रणाची गरज नाही. राज्यात जेव्हा यात्रा येईल, तेव्हा जे समविचारी पक्ष आहे, त्यांना निमंत्रण देण्यात येईल,असे देखील यावेळी पटोले म्हणाले.
शिक्षण विरोधी धोरण : सध्या गृहपाठवरून जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यावर पटोले म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात जे सरकार आत्ता आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना शिक्षण मिळू नये, अश्याच प्रकारचे धोरण राबवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शिक्षण प्रणालीत मोठे बदल ते आणतील,असे देखील यावेळी पटोले म्हणाले.
भाजपचे घाणेरडे राजकारण : नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. नोट बंदीच्या काळात भाजपने प्रत्येक जिल्ह्यातील जमिनीही विकत घेतल्या. आणि कार्यालय बांधले. चिवडा पार्टी ही भाजप होती. नोट बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा हा जमा करण्यात आला. आणि त्या पैशांच्या माध्यमातून आज देशभरात राजकारण केले जात आहे. आमदारांना विकत घेतले जाते आहे. केंद्रातील तपास यंत्रणांच्या भय आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लोकशाही विकत घेण्याचा जो प्रकार भाजपने सुरू केला आहे, त्यावर लक्ष दिले पाहिजे. भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टींवर राजकारण भाजप करत आहे, अशी टीका देखील यावेळी पटोले यांनी केली.
काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, ते स्वतः भय आणि भ्रष्टाचारामुळे तिथे गेले आहेत. ते तिथे का गेले? हे पहिले त्यांनी जाहीर करावे. ज्यांना काँग्रेसने मोठ केले, तेच आत्ता काँग्रेसवर बोलत असतील तर त्यांच्यावर काय बोलायचे, असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.