पिंपरी चिंचवड पुणे पिंपरी चिंचवड शहरातील इकोफ्रेंडली इस्कॉन मंदिरात ISKCON Temple in Pimpri Chinchwad मोठ्या उत्साहाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. 1995 साली पायाभरणी केलेले हे मंदिर शहरातील श्रीकृष्ण भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. हजारोंच्या संख्येने भाविक येथे येऊन श्रीकृष्णाचे दर्शन Darshan of Lord Krishna घेतात. नागरिकांनी मंदिरात यायला हवे. यामुळे मानसिक समाधान मिळते. अनेक अडचणींवर मात करता येते, असे रावेत इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष जगदीश गोरंगदास यांनी Jagdish Gorangadas, President of Ravet ISKCON Temple सांगितलं आहे. ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
मंदिरात मानसिक समाधान मिळते ते म्हणाले की, मंदिरात येऊन मानसिक समाधान समाधान होते. त्यामुळे प्रत्येकाने मंदिरात आले पाहिजे असे आवाहन त्यांनी भाविकांना केले आहे. या मंदिराची 1995 साली पायाभरणी केली. 2003 साली मंदिर उभारणीचा विचार केला. पण येणाऱ्या पिढी पुढे आदर्श निर्माण होईल, असे बांधकाम करण्याचे ठरवलं होते. यातूनच रावेत इस्कॉन मंदिर उभारण्यात आले आहे. अशी माहिती अध्यक्ष जगदीश गोरंगदास यांनी दिली.
ईस्काॅन मंदिर इकोफ्रेंडली श्रीकृष्णाचे मंदिर इकोफ्रेंडली असून लाकडाचा वापर करण्यात आला आहे. जांभ्या दगड (लाल दगड) वापरून मंदिर बांधण्यात आले. भाविकांना उभरण्यासाठी मंदिरात बाल्कनीदेखील करण्यात आली आहे. जगात 80 पेक्षा अधिक देशात इस्कॉन संस्था काम करते. तसेच त्यांनी मंदिर बांधले आहेत. जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम असतात रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.