पुणे - गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यात प्रसूतीनंतर अवघ्या काही वेळातच आई झालेल्या महिलांच्या मृत्यूंच्या ( Pune Mother Death ) घटनेत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याला महत्त्वाचं कारण कोरोना ठरल्याचं अहवालात ( Mother Death Due To Corona ) आढळून आल आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ते या वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत जवळपास 31 टक्के मातांची मृत्यू नोंद पुणे महापालिकेत झाली आहे. ही आकडेवारी मागील आकडेवारीच्या तुलनेत खूप मोठी असल्याचे सांगितले जात आहे.
१० महिन्यात 96 माता मृत्यूची नोंद - महापालिकेच्या विश्लेषणात अनेक बाबी उघड झाल्या आहेत. कोरोनामुळे गर्भवती महिलांच्या मृत्यूची संख्या अधिक आहे. गेल्या 10 महिन्यात पुण्यात जवळपास 96 घटनांची नोंद झाली आहे. नुकतंच पुणे महापालिकेकडून यासंदर्भात विश्लेषणदेखील करण्यात आले आहे. पुणे शहरात प्रसूतीनंतर काही वेळातच आई झालेल्या ज्या महिलांचा मृत्यू झाला, त्याला कोरोना हे महत्वाचे कारण ठरले आहे. गेल्या वर्षी जानेवारीपासून ते या वर्षी एप्रिलपर्यंत कोरोनामुळे 31 टक्के मातामृत्यू नोंद महापालिकेत झाली आहे. या 10 महिन्यात 96 माता मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 83 मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 19 टक्के माता मृत्यू मागे इतर वैद्यकीय कारणे होती, तर 14 टक्के मृत्यू हे स्पेप्सीसमुळे (इतर संसर्ग) झाले असल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे.
माता मृत्यू म्हणजे काय? - पुणे शहरात झालेल्या माता मृत्यूचे प्रमाण गर्भधारणा, प्रसूतीमध्ये किंवा प्रसूतीनंतर 42 दिवसात गर्भधारणेशी संबंधित कारणांमुळे झालेला मृत्यू म्हणजेच माता मृत्यू होय. दरम्यान, आकडेवारी बघितली तर कोरोनामुळे झालेले मृत्यू 31 टक्के, न्याय वैद्यकीय कारणांमुळे झालेले मृत्यू 19 टक्के, इतर कारणाने 18 टक्के, सेप्सीस- 14 टक्के, गर्भधारणेतील उच्च रक्तदाब 10 टक्के, न्यूमोनिया 5 टक्के, प्रसूती पश्चात रक्तस्राव 3 टक्क्यांचा समावेश आहे. मातामृत्यू हा सार्वजनिक आरोग्याचा एक संवेदनशील निकष आहे. कोरोनामुळे मागील काही वर्षात आरोग्याच्या सर्व निकषांवर सर्वदूर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. हाच परिणाम मातामृत्यूवर झाला असल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.
गर्भवती महिलांना डेल्टा ठरला प्राणघातक - शहरात गेल्या फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांची रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळाली. हीच कोरोनाची दुसरी लाट देखील ठरली आहे. यात कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे प्रमाण सर्वाधिक आहे. याच काळात सर्वाधिक मातामृत्यू नोंदवले गेले असल्याची माहिती आरोग्य तज्ञांनी दिली आहे.
हेही वाचा - Rana's Complaint In Lok Sabha : चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस