ETV Bharat / city

MNS Vs Governor Koshyari : 'कोश्यारींनी पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेची कुवत...'; राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मनसेचा हल्लाबोल

मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलं आहे. त्यावर राज्यपालांनी हे विधान करून पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेची कुवत सिद्ध केली आहे, अशी घणाघाती टीका मनसेने केली ( MNS Attacks On Governor Bhagatsingh Koshyari ) आहे.

raj thackeray governor koshyari
raj thackeray governor koshyari
author img

By

Published : Aug 7, 2022, 3:49 PM IST

पुणे - नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच नागपूरमध्ये केलं आहे. यावरून आता नवा वाद उभा राहिला असून राज्यपालांवर विरोधक सडकून टीका करत आहेत. मनसेने देखील या वादात उडी घेतली आहे. मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी राज्यपालांच्या विधानाचा मनसे स्टाईल समाचार घेतला ( MNS Attacks On Governor Bhagatsingh Koshyari ) आहे.

'कोणा एका व्यक्तीमुळे भूषवत...' - हेमंत संभूस म्हणाले की, राज्यपाल कोश्यारींना जर कल्पना नसेल तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो आहे. आज परदेशामध्ये औद्योगिक असो राजकीय असो किंवा संस्थामक असो जे काही आपले भारतीय बांधव भूषवत आहेत ते त्यांच्या गुणवत्तेनुसार भूषवत आहेत ते कोणा एका व्यक्तीमुळे भूषवत नाहीत. आजच नाही तर गेली 50 वर्ष हा सन्मान त्यांना लाभत आहे. त्यामुळे राज्यपालांनी हे विधान करून पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेची कुवत सिद्ध केली आहे, अशी घणाघाती टीका हेमंत संभूस यांनी केली आहे.

'ते केवळ मोदींचा उदो-उदो करण्यासाठी' - राज्यपाल कोश्यारींनी नागपूरमध्ये बोलताना भारतींयांबद्दल जे विधान केलं आहे, ते केवळ मोदींचा उदो-उदो करण्यासाठी केलं आहे. राज्यपालांचं हे विधान हास्यास्पद आणि निंदनीय आहे. राज्यपालांनी देशाचा अपमान केला आहे, असेही संभूस यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल? - 'आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही काळ पाहिला आहे. मात्र, पहिल्यांदा देशासाठी वीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जादूमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे. मोदींच्या आधी विदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या प्रथा, परंपरांना लोक नावे ठेवायची. मात्र, आज मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे. नाहीतर याआधी भारतात काहीच करण्यासारखे नाही, हा गुलामांचा देश आहे, असाच समज होता,' असं विधान राज्यपालांनी केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा - MLA Sachin Ahir :...हे म्हणजे शिंदे गटातील आमदारांना उशिरा सुचलेलं शहाणपण; सचिन अहिरांची टीका

etv play button

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.