पुणे - लष्कर-ए-तोयबा ( Lashkar e Toiba ) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे पुणे एटीएसने कारवाई करत इनामुल या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
आखणी एक संशयीताला घेतले ताब्यात - जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद मोहम्मद या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वी अटक केली होती. आता जुनैद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे पुणे एटीएसने कारवाई करत इनामुल या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याला आज पुणे न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मोहम्मद जुनैद याच्या संपर्कात होता - दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए तोयबासाठी काम करणाऱ्या जुनैद मोहम्मद याला पुण्यातून 24 मे ला अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. त्याला एटीएसच्या टीमने पुण्यातील दापोडी येथून अटक केली होती. त्यानंतर बंदी असलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेत भरतीसाठी कार्यरत असलेल्या आफताब हुसेन शाह याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू- काश्मीरमधून एक तारखेला अटक करण्यात आली होती. 1 जून ला आफताब याला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले.आणि न्यायालयाने त्याला 14 जूनपर्यंत एटीएस कोठडीत वाढ केली होती. मोहम्मद जुनैद याच्या संपर्कात तो होता. आत्ता या प्रकरणात उत्तर प्रदेश मधील सहारनपूर येथे पुणे एटीएसने कारवाई करत इनामुल याला तरुणाला ताब्यात घेतले आहे.
दहशतवादी संघटनांशी होते संबंध - दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए तोयबासाठी काम करणाऱ्या जुनैद मोहम्मद याला पुण्यातून 24 मे रोजी अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली. त्याला एटीएसच्या टीमने पुण्यातील दापोडी येथून अटक केली होती. त्यानंतर बंदी असलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेत भरतीसाठी कार्यरत असलेल्या आफताब हुसेन शाह याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू- काश्मीरमधून एक तारखेला अटक करण्यात आली होती. 1 जून रोजी आफताब याला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. आणि न्यायालयाने त्याला 14 जूनपर्यंत एटीएस कोठडीत वाढ केली होती.
हेही वाचा - accident Jalna Samrudhi Highway : जालना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एक जण ठार