पुणे - जगभर मानसिक आरोग्य दिन म्हणून 10 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे या दिनाचे प्रयोजन असते. वाचा, ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट!
भारतात मनोरुग्णालय हे फक्त अधिकृतरित्या 37 आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 मनोरुग्णालयांचा समावेश आहे. मनोरुग्णांची संख्या पाहता ही रुग्णालये खूपच कमी आहेत. मनोरुग्णालयातून तेथून बरे करून त्यांना समाजात परत आणले जात नाही. तिथे दाखल झालेल्या रुग्णांवर योग्य ते पूर्ण उपचार करण्याची सोय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच पुण्यातदेखील उपलब्ध नाही, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
हेही वाचा-phone tapping case : सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांना मुंबई पोलिसांचे समन्स
एकूण रुग्णापैकी 5 ते 10 टक्केच रुग्णांनाच मनोरुग्णालयात प्रवेश
मनोरुग्णांच प्रश्न असा आहे, एकूण रुग्णापैकी 5 ते 10 टक्केच रुग्णांनाच मनोरुग्णालयात प्रवेश मिळू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक रुग्णांना यात 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहावे लागते. काही काही रुग्ण तर 3 ते 5 वर्षदेखील राहतात. साधारणत: 25 टक्के रुग्ण हे दीर्घकाळापर्यंत राहतात. तेवढी जागा आज राज्यात आणि भारतात नाहीय. त्यामुळे खाटांची सोय नाही, ही महत्त्वाची बाब असेदेखील भोंडवे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अंदाजे 4 हजार कोटींचे नुकसान- अजित पवार
येरवड्यातील मनोरुग्णांसाठी मोठ्या निधीची गरज
पुण्यातील येरवडा येथे असलेले मनोरुग्णालय हे आशियातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. परंतु यांच्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. या रुग्णालयात 1,260 बेड्स आहेत. या रुग्णालयात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मनोरुग्ण तज्ज्ञ आहेत. मध्यंतरी फक्त दोनच मनोरुग्ण तज्ज्ञ होते. या रुग्णालयात किमान 20 मनोरुग्ण तज्ज्ञांची गरज आहे. मनोरुग्णाबरोबर मानसिक समुपदेशकांचीदेखील खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे.
विशेष गोष्ट म्हणजे या रुग्णांची स्वच्छता तसेच उपचारासाठी असणारे तृतीयश्रेणी आणि चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्याची संख्या ही 200 ने कमी आहे.या सगळ्यांमुळे या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यांना पूर्ण उपचार डॉक्टरांच्या मनात असूनही देता येत नाहीत. राज्यातील मनोरुग्ण रुग्णालयांसाठी 400 कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, अशी आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली. हा निधी वापरला तर यापुढे डॉक्टर, तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कामगार भरले जातील. ती एक दिलासादायक बाब असेल असेही यावेळी भोंडवे यांनी सांगितले.
हेही वाचा-कोल्हापूर- व्हीआयपीकडून मंदिरात बूट घालून प्रवेश, गुन्हा दाखल करण्याची भाविकांची मागणी
समाजात मानसिकता बदलण्याची गरज
समाजात या मनोरुग्ण रुग्णालयाला रुग्णालय नव्हे तर पागलखाना समजला जातो. तिथे रुग्ण पाठवायचा आणि आपली जबाबदारी झटकायची अशा पद्धतीची मनोवृत्ती समाजात असते. त्यामुळे कित्येकदा तिथे बरे झालेल्या रुग्णांना तेथून डिस्चार्जदेखील करता येत नाही. ही खूप मोठी हृदयद्रावक परिस्थिती आहे. या मनोरुग्ण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्या रुग्णाला नातेवाईकांकडे ठेवायची आवश्यकता असते. पण अशा रुग्णांना स्टेज 2 ची गरज असताना ती उपलब्ध होत नाही.