पुणे - देशातील मध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘हनी क्लस्टर’ तयार करण्यात येणार आहे. तसेच मधाच्या वापरला चालना मिळावी, यासाठी साखरेच्या पाकिटाप्रमाणे मधाचे ‘सॅशे’ तयार केले जातील. मधाचे क्यूब तयार करण्याबाबतही संशोधन सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
हेही वाचा... सरकारी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापकाची मानसिक तणावातून आत्महत्या
पुण्यातील केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला नितीन गडकरी यांनी आज सोमवारी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘एमएसएमई’ आणि ‘खादी-ग्रामोद्योग’ विभागांतर्फे भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
हेही वाचा... शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
'मध' उद्योगाला चालना देण्यासाठी साखरे प्रमाणेच मधाचेही 'सॅशे' बनवणार
आगामी काळात विमाने, पंचतारांकित हॉटेल्समध्ये चहा-कॉफीत मिसळण्यासाठी साखरेसोबत मधाचाही पर्याय उपलब्ध राहील. यासाठी प्रमुख विमान कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. याशिवाय ‘खादी डेनिम’ लोकप्रिय होत असून, महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या मदतीने त्याचा प्रसार करण्याचा मानस असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा... शेअर बाजारातील फटका; गुंतवणूकदारांनी गमाविले ३ लाख कोटी रुपये
गडकरी म्हणाले, उत्पादनाच्या विपणनासाठीही चीनच्या ‘अलिबाबा’ कंपनीसारखे ‘मार्केटिंग पोर्टल’ तयार केले जात आहे. उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टपाल विभागाशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील व्यक्तीला थेट अरुणाचल प्रदेशातील वस्तू देखील घरबसल्या खरेदी करता येईल. पर्यायाने शेतकरी-आदिवासी-ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळेल.
सरकारी संस्थांनी केलेले संशोधन सर्वसामान्यांना पाहता यावे, तसेच या संशोधनाच्या आधारे उत्पादनाची निर्मिती करता यावी, यासाठी ‘एमएसएमई’ विभागातर्फे विशेष पोर्टल तयार केले जात आहे. अशी माहितीही गडकरींनी यावेळी दिली.