ETV Bharat / city

National Startup Award : पुण्यातील 'या' कंपन्यांना मिळाला यंदाचा स्टार्टअप इंडिया अवॉर्ड, पाहा कंपन्यांची भन्नाट आयडिया

औद्योगिक विश्वात नाविन्यपूर्ण संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया अवॉर्ड (National Startup Awards 2021) सुरु केला आहे. यात पुण्यातील चार स्टार्टअप कंपन्यांना हा अवॉर्ड मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०२० पासून या अवॉर्डची सुरुवात केली. त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात-निर्यात अशा एकूण आठ क्षेत्रांचा समावेश आहे.

startup file photo
स्टार्टअप फाईल फोटो
author img

By

Published : Jan 24, 2022, 9:57 PM IST

Updated : Jan 24, 2022, 10:37 PM IST

पुणे - गेल्या काही वर्षांपासून देशात अनेक स्टार्टअप नावारूपाला आले. आपलीआपली नवी आयडिया घेवून अनेक तरुण बिजनेस आयडिया डेव्हलप करण्यासाठी मार्केटमध्ये स्टार्टअप (Startup) सुरू करत असतात. त्याचबरोबर या स्टार्टअप कंपन्या भारताला ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून ओळख प्राप्त करून देण्यासाठी मेहनत घेत आहेत. याला अजून चालना आणि बळ मिळावे म्हणून औद्योगिक विश्वात नाविन्यपूर्ण संशोधन करणार्‍या तरुण संशोधकांसाठी केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया अवॉर्ड (National Startup Awards 2021) सुरु केला आहे.

'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा
  • काय आहे स्टार्टअप इंडिया अवॉर्ड-

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी २०२० पासून या अवॉर्डची सुरुवात केली. त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात-निर्यात अशा एकूण आठ क्षेत्रांचा समावेश आहे.

यासाठी भारतातून 2,177 अर्ज आले होते. त्यातील 46 जणांना हा सन्मान जाहीर झाला आहे. कोरोना महामारीमुळं सर्व अवॉर्डप्राप्त संशोधकांना दिल्लीत न बोलावता शनिवारी दिल्लीत हे प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आले आहे.

  • पुण्यातील चार कंपन्यांना जाहीर झाला हा स्टार्टअप इंडिया अवॉर्ड -

नुकत्याच झालेल्या या समारंभात पुण्यातील ४ कंपन्यांना या अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. आपल्या नवीन बिजनेस आयडिया विस्तारीत केल्याबद्दल पुण्यातील या कंपन्यांना हा अवॉर्ड देण्यात आला आहे. त्यातील पुण्यातील उड चलो (Ud Chalo) कंपनी त्याचबरोबर रीपोज कंपनी (Repos IOT India Pvt Ltd) आणि पुण्यातील डॉक्टर अनिरुद्ध जोशी (Dr. Aniruddha Joshi) यांना हा अवॉर्ड देण्यात आले आहे.

आता नेमकं या कंपन्यांनाच का हा अवॉर्ड देण्यात आला? नेमकं या कंपन्यांचे काय प्रोडक्ट आहेत हेच आपण या आमच्या विशेष रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत...

  • भारतीय जवानांच्या सेवेसाठी स्थापन झालेली पुण्यातील 'उड चलो' -

सैन्यदल आणि निमलष्करी दलातील जवान, सेवानिवृत्त जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वस्तात विमानप्रवास उपलब्ध करून देणाऱ्या 'उड चलो' या पुण्यातील स्टार्टअप कंपनीला केंद्र सरकारचा यंदाचा राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात वाहतूक नियोजन आणि नवसंशोधन श्रेणीत 'उड चलो'ला नावीन्यपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या परिणामकारक स्टार्टअप म्हणून गौरविण्यात आले.

'सैन्यदलातील जवानांच्या सुट्ट्या अखेरच्या क्षणी मंजूर होतात. त्यामुळे त्यांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे अवघड होते. दुसरीकडे विमानांमध्ये अनेक आसने रिकामी असतात. ही आसने जवानांना रेल्वेच्या 'एसी टू टायर' व 'एसी थ्री टायर'च्या तिकीट दरात उपलब्ध करून दिल्यास त्यांची प्रवासाची गरज भागेल; तसेच विमान कंपन्यांना नवीन ग्राहकवर्ग उपलब्ध होईल, असा प्रस्ताव 'उड चलो'ने विमान कंपन्यांकडे दिला आणि पहिल्या वर्षी आम्ही १६०० जवानांना विमानप्रवास उपलब्ध करून दिला. आता या स्टार्टअपच्या माध्यमातून दर वर्षी सैन्यदलांतील आजी-माजी असे सोळा लाख जवान आणि त्यांचे कुटुंबीय विमान प्रवास करतात,' असे सीईओ रवीकुमार यांनी सांगितले.

  • रीपोज आयोटी डिझेल मोबाईल डिस्पेन्सर व्हॅन -

2017 साली मोबाईल पेट्रोल ही संकल्पना पुण्यातील रीपोज आयोटी या कंपनीने राबवली. आज देशातील 28 राज्यांमध्ये मोबाईल डिझेल डिस्पेंसर या मोबाईल पंपाद्वारे डिझेल विक्री केली जात आहे. छोट्या टँकरद्वारे आणि ड्रमद्वारे डिझेल हे त्या-त्या कंपनीपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. हे काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण मोबाईल डिस्पेंसर डिझेल करू शकतो आणि तेथून रिपोझ या कंपनीची स्थापना करण्यात आली.

  • नाडी मोजून आजार सांगणारे अनोखे तुर्या नाडी परीक्षण यंत्र -

पुण्यातील डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी एक यंत्र तयार केलं आहे. यंत्राला आयुर्वेदाची सांगड घालत त्यांनी चक्क नाडी मोजण्यासाठी यंत्र तयार केलं आहे.

डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या नाडी तरंगिणीचे वैशिष्ट्य असे की, भारतातील प्राचीन आयुर्वेदातील मनगटावरील नाडी तपासून शरीरातील रोगाचे निदान करणे व उपाय सुचवणे हे काम त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने संगणकावर तसेच मोबाईलवरही बसवले. त्यांचे ‘स्टार्टअप इंडिया’ सन्मान मिळालेले ‘तुर्या’ नावाच्या उपकरणाद्वारे स्वत:च्या प्रकृतीबाबत रोजच्या रोज अपडेट मिळतात. डॉ. जोशींनी तयार केलेली हे उपकरणं सध्या बारा देशात वापरली जात आहेत. तसेच याच्या आधारे एक लाख लोकांची शरीर व आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडे संकलित स्वरुपात उपलब्ध आहे.

Last Updated : Jan 24, 2022, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.