ETV Bharat / city

Phule Wada Gate Rename : फुले वाड्याच्या कमानीला माजी नगरसेवकाच्या आईचे नाव, समता परिषदेने काढला बोर्ड - श्रीनाथ भिमाले बातमी

पुणे शहरात सध्या माजी नगरसेवक चमकोगिरीचा कहर करताना दिसत आहेत. सुरुवातीला सॅलिसबरी पार्कला स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले ( Shrinath Bhimale ) यांनी आपल्या परिजनाचे यांचं नाव दिले आणि आता तर थेट महात्मा फुले वाड्याच्या ( Phule Wada Gate Rename ) कमानीला भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्या मातोश्रीचे नाव देण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.

Phule Wada Gate Rename
Phule Wada Gate Rename
author img

By

Published : May 28, 2022, 3:45 PM IST

पुणे - पुणे शहरात सध्या माजी नगरसेवक चमकोगिरीचा कहर करताना दिसत आहेत. सुरुवातीला सॅलिसबरी पार्कला स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या परिजनाचे यांचं नाव दिले आणि आता तर थेट कहरच करण्यात आला आहे. महात्मा फुले वाड्याच्या कमानीला भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्या मातोश्रीचे नाव देण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार समोर येताच महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत हा फलक कमानीवरून खाली उतरला आहे.

प्रतिक्रिया

महात्मा फुले वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपच्या माजी नगरसेविका विजयलक्ष्मी हरिहर यांच्या सासू लक्ष्मी हरिहर यांचा नावाचा फलक लावण्यात आला होता. त्याखाली मार्गदर्शक म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांचे नाव टाकण्यात आलं होतं, तर संकल्पना म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव टाकण्यात आलं होतं. मात्र, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा फलक हटवल्यानंतर पुण्यात आता ऐतिहासिक वास्तू, मैदान, उद्यान यांना स्थानिक नगरसेवकांच्या परिजनांचे नाव देण्याचा हा प्रकार पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे.

हा प्रकार आम्हाला 7 ते 8 दिवसांपूर्वीच लक्षात आला. याबाबत आम्ही प्रशासनाला माहिती देखील दिली. जे कोणी माजी नगरसेवक आहे, त्यांना संपर्क देखील केला. पण, तरीही तो काढण्यात आला नाही म्हणून आज आम्ही समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा बोर्ड काढला आहे. हे आमचे मंदिर असून या ठिकाणी आम्हाला ऊर्जा मिळते. या वास्तूला अश्या पद्धतीने नाव देणे चुकीचे असून याचा निषेध म्हणून आज आम्ही हा बोर्ड काढला आहे, असं यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मध्यंतरी जेव्हा सैलसबरी पार्क येथे भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी जेव्हा उद्यानाला वडिलांचा नाव दिला होते, तेव्हा भाजप खासदार गिरीष बापट यांनी यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण अस असताना देखील अश्या पद्धतीने भाजप नगरसेवकांकडून घरच्या मंडळींची उद्याने, रस्ते यांना नाव देण्याचं प्रकार थांबताना दिसत नाही.

हेही वाचा - Menstrual Hygiene Day : मासिक पाळी स्वच्छता दिनी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय; 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.