ETV Bharat / city

'पुण्याचा 'देवमाणूस': लग्नाच्या आमिषाने विवाहित डॉक्टरचा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या नर्सवर बलात्कार - लेटेस्ट बलात्कार न्यूज

स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या नर्स तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत डॉक्टरने बलात्कार केला. या तरुणीला आपण तुझी युपीएससीची परिक्षा झाल्यावर लग्न करू असे खोटे आश्वासन डॉक्टरने दिले. त्यानंतर मात्र . . . .

Pune
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 5, 2021, 9:19 AM IST

पुणे - विवाहित डॉक्टरने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या नर्स तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याने खळबळ उडाली. शशिकांत शामराव सोरटे (39, रा. शिवाजीनगर, गणेशखिंड) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आरोपी डॉक्टर आणि पीडित तरुणी नर्स म्हणून एका नामांकित रुग्णालयात काम करतात. एकत्र काम करत असताना 6 वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. तरुणी नर्स म्हणून काम करत असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती. दरम्यान ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. तर, या तरुणीला आपण तुझी युपीएससीची परिक्षा झाल्यावर लग्न करू असे खोटे आश्वासन डॉक्टरने दिले. तरुणीने काही वेळेस विरोध केला असता, तिला मारहाण देखील करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर मात्र पीडितेला डॉक्टरने त्याचे अगोदरच लग्न झाल्याची माहिती दिली.

पीडितेसोबत संबंध ठेवताना डॉक्टरने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची भीती दाखवत डॉक्टरने ब्लॅकमेल केल्याचा आरोपही या पीडितेने केला आहे. पीडितेने स्वारगेट पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक निरीक्षक जमदाडे हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.