पुणे - सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात 50 जणांनीच हजर राहायची मर्यादा असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या पुण्यातील शाही विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी जमली होती. स्वाभाविकपणे मास्क आणि शारीरिक अंतर या नियमांच काय झालं, हे दृश्यातूनच दिसतंय..
अनेक आमदार, खासदारांची उपस्थिती -
विशेष म्हणजे या सोहळ्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेततील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नितेश राणे, गोपीचंद।पडळकर, हर्षवर्धन पाटील अशी खास मंडळी उपस्थित होती.
कोरोना नियमांचा विसर -
कोरोनाचा प्रादुर्भाव असताना व लस आली नसताना त्याचबरोबर दुसरी लाट येण्याची टांगती तलवार असताना या लग्नसोहळ्याने कोरोनाचे संकट संपले की काय असे वाटते. लोकप्रतिनिधींनाच दो गज की दूरी, मास्क पहनना जरुरी याचा विसर पडलेला दिसतो. विवाह सोहळ्यात 50 संख्येची मर्यादाही पाळली गेली नाही, हे खेदजनक आहे.
राम सातपुते आणि त्यांच्या भावी पत्नी यांना विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा देतानाच वधू-वर आणि राजकीय वऱ्हाडी मंडळींनी मात्र सर्वसामान्य माणसांना एक नियम आणि आपल्याला एक असं समजू नये एवढीच अपेक्षा.