पुणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde visit Pune ) हे उद्या एकदिवस पुणे दौऱ्यावर येत असून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर ( First visit of CM Shinde in Pune after taking oath as CM ) येत आहे. पुणे शहरातही शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसैनिकांकडून उद्या शक्तिप्रदर्शन ( Shinde Groups power demonstrate in Pune ) करण्यात येणार आहे. अनेक शिवसैनिक शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
असा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा - उद्या सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे पाऊस अतिवृष्टी पीक, पाणी व विकास कामे याबाबत आढावा बैठक करणार आहे. यानंतर दुपारी 1:20 वाजता फुरसुंगी येथील पाणी योजना प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करणार आहे. मुख्यमंत्री शिंदे दुपारी 2:20 वाजता खंडोबा जेजुरी देवस्थान येथे भेट देतील. त्यानंतर सासवड येथे दुपारी 2:45 वाजता शिवसेना पक्षाची जाहीर सभा घेतील. तसेच 4 वाजता माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या निवासस्थानी येईल. शिंदे सायं. 5:45 वाजता हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करतील. यानंतर ते संध्याकाळी 7 वाजता आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देतील. ते रात्री 8:40 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बैठक घेतील. मंदिराच्या सभागृहात आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रबाबत बैठक असणार आहे.
उद्या एकाच दिवशी शिंदे-ठाकरे समोरा-समोर - उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर येत आहे. पण, त्याचबरोबर शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील उद्या पुणे दौऱ्यावर येत आहे. विशेष म्हणजे, सायंकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे कात्रज येथील तानाजी सावंत यांच्या निवास्थानी भेट देणार आहे. तर सायंकाळी 6:45 मिनिटांनी आदित्य ठाकरे हे कात्रज येथे शिवसंवाद साधणार आहे. म्हणजेच उद्या पुणे शहरात दोन्ही नेत्यांकडून टोलेबाजी पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - लीला मोटली: बुकर पारितोषिकांच्या यादीतील सर्वात तरुण लेखिका