पुणे - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक आगळा वेगळा उपक्रम पाहायला मिळाला आहे. चक्क एक दिवसासाठी पोलीस आयुक्तालयाचा कारभार एका दृष्टीहीन महिलेकडे देण्यात आला होता. तर, अप्पर पोलीस आयुक्तांचा खुर्चीवर पतीच्या निधनानंतर संघर्ष कराव्या लागणाऱ्या महिला विराजमान झाल्या होत्या. रीना पाटील असे या दृष्टीहीन महिलेचे नाव असून ज्योती माने या अप्पर पोलिसांच्या खुर्चीवर बसल्या होत्या. त्या दोघींना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी कडक सॅल्युट केला.
दरम्यान, पोलीस उपायुक्त पदाची एका दिवसाची जबाबदारी सुशिक्षित दिव्यांश तामचीकर याच्यावर सोपविण्यात आली होती. हा सर्व प्रकार तिघांनाही भाराहून टाकणारा होता.
सर्वसामान्यांना काम समजावे म्हणून हा उपक्रम राबविला-
पोलीस आयुक्त म्हणाले की, सर्व सामान्य नागरिकांना आमचे काम समजले पाहिजे. आमच्या प्रति संवेदनशीलता दाखविली पाहिजे. या हेतूने ही नवीन संकल्पना राबविण्यात आली. त्याच बरोबर सर्व घटकांबरोबर आम्ही आहोत हे दाखविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच महिलांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल शांत न राहता त्याच्या विरोधात आवाज उठवायला हवा, आम्ही त्यांच्यासोबत आहोतच, असा विश्वास अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी महिलांना दिला.
दोन्ही महिला अक्षरशः भाराहून गेल्या होत्या-पिंपरी-चिंचवडमध्ये 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पदाचा कार्यभार चक्क एका दृष्टीहीन महिलेच्या हाती सोपविला होता. तर, अप्पर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे ही ज्योती माने यांच्याकडे सोपविण्यात आली. शिवाय, पोलीस उपायुक्त पदाची एका दिवसाची जबाबदारी सुशिक्षित दिव्यांश तामचीकर याच्यावर सोपविण्यात आली होती. हा सर्व प्रकार तिघांना ही भाराहून टाकणारा होता.
या क्षणाचा स्वप्नात ही विचार केला नव्हता- रीना पाटीलदृष्टीहीन रीना पाटील म्हणाल्या की, 'या क्षणाचा स्वपन्नातही विचार केला नव्हता, आम्ही पुर्णतः अंध असल्याने फक्त पोलिसांबद्दल ऐकू शकतो. मात्र जे ऐकल ते खरं निघालं पोलीस खरेच सामान्य माणसाचे मित्र असतात. मी दिल्लीला गेले होते, तेंव्हा घरच्यांनी सांगितले होते. आधी पोलिसांना भेट ते तुला व्यवस्थित मार्गदर्शन करतील आणि योग्य पत्त्यावर सोडतील, झालेही तसचं. कुठलीही स्वार्थ किंवा न्यूनगंड न बाळगता पोलीस मदत करतात. हे त्यांच मोठेपण, आज मी पोलीस आयुक्त या पदाची एक दिवसाची सूत्रे स्वीकारल्यावर एक नक्की सांगावेस वाटते की, कायदे कठोर आहेत. पण त्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे तरच महिला सुरक्षित राहतील.'
अपप्रवृत्तीचा सामना करण्याची ताकद वाढली- ज्योती माने तर, ज्योती माने म्हणाल्या की, पतीच निधन झाल्यानंतर समाजातील विकृत मानसिकतेचा परिचय झाला. अनेकवेळा हताश झाले. मुलीचा सांभाळही करायचा होता. अशा परिस्थितीत फक्त पोलीसांनी जगण्याचे बळ वाढवल. आज जेंव्हा हा सन्मान स्विकारला त्याचा अपप्रवृत्तीचा सामना करण्याची ताकद वाढली कुठल्याही महिलेवर अन्याय झाल्यास तिनेही पोलीसांची मदत घ्यावी ते आपल्यासाठीच असतात अस त्यांनी म्हटलं आहे.