ETV Bharat / city

महाविकास आघाडी सरकारचा पोवाड्यांना विरोध आणि एल्गारला पाठिंबा - चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकारचा पोवाड्यांना विरोध असून, एल्गार परिषदेला पाठिंबा असल्याचे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

author img

By

Published : Feb 19, 2021, 4:03 PM IST

Updated : Feb 19, 2021, 4:14 PM IST

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील

पुणे - शिवजयंतीला पोवाडे म्हणायचे नाही. देशभक्ती निर्माण करायची नाही. मग काय एल्गार परिषद करायची, ज्याच्यात या देशाचे तुकडे करायची भाषा बोलली जात आहे. हिंदू समाजाला सडका समाज म्हटले जाते आणि हे हिंदू धर्मच सहन करतो बाकीच्या धर्माबाबत बोलायची काय हिंमत आहे कोणात. त्यामुळे हे सहनशीलतेचा अंत चाललेला आहे. पोवाड्यांना विरोध आणि एल्गारला पाठिंबा असे या सरकारचे चालले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

भाजप युवा मोर्चातर्फे युवा वॉरियर्स शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज संपूर्ण जगात पसरवणार- मुख्यमंत्री ठाकरे

सरकार घाबरत आहे - चंद्रकांत पाटील

कोरोनाचे प्रमाण वाढत चालले हे मान्य आहे. काळजी घेतली पाहिजे हेही मान्य आहे. परंतु आत्ता सुरू झालेला गाडा एकूण जनजीवनाचे अर्थकारणच उलटे फिरवता येणार नाही. काळजी घेऊन हे करा ते करा असे म्हणावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा आमचा प्रेरणेचा, अभिमानाचा विषय असताना त्याला 144 कलम मग तिकडे एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष गावोगावी फिरत आहेत. तसेच अनेक नेते हे आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन करतात त्याला परवानगी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला परवानगी नाही. संपूर्ण कोरोना काळात विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला सहकार्य केलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की अधिवेशन आलं की कोरोना वाढलाय म्हणायचं आणि अधिवेशन कमी दिवसांचं करायचं आणि चर्चा टाळायची. होणारे आरोप सहन करण्याची ताकद नाही. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीला घाबरता पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की, तुमचे 169ची मेजोरिटी आहे मग कशाला घाबरता. आम्हाला सभागृहात नवीन होणारा अध्यक्ष सहकार्य करणार, असे सांगा फक्त पण तरी घाबरता. तसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून तरुण रस्त्यावर येऊन संघटित होईल, देशप्रेमी होईल हे तुम्हाला नको आहे का? अशी टीका यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर केली.

हेही वाचा - आयपीएल लिलावात 'आश्चर्यचकित' करणारे खेळाडू

प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र

नाना पटोले माझे मित्र असून, ते चांगले मॅच्युअर्ट नेते आहेत. त्यांनी हे म्हणणे अपेक्षित नाही. या देशात कोणी काय बोलावं कोणी बोलू नये. ज्याला त्याला स्वतंत्र आहे. तुम्ही मोदींवर काहीही बोलता आम्ही तुमच्यावर काय बंदी घालायची का? प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. सरकारमध्ये तुम्ही आहात, सरकारने अशा इंडस्ट्रीला प्रोटेक्शन द्यायचं असते. इथं तर सरकारमधील एक नेता म्हणतोय आम्ही बहिष्कार घालतो हे चुकीचं आहे, असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

Last Updated : Feb 19, 2021, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.