पुणे - भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी केली आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले ( nana Patole Criticized ncp ) आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाठीत खंजीर खुपसला सांगण्यापेक्षा महाविकास आघाडीतून काँग्रेसने बाहेर पडावं, असा सूचक सल्ला दरेकरांनी नाना पटोलेंना दिला ( pravin darekar On nana Patole ) आहे.
'तू मारल्यासारखे कर मी...' - पुढे दरेकर यांनी म्हटले की, खंजीर खुपसला त्याच्याही गुदगुल्या त्यांना होत आहेत. एकीकडे खंजीर खुपसला, असे म्हणायचे व दुसरीकडे मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसायचे. याशिवाय हे दुसरे काही करू शकत नाहीत. जर हिंम्मत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. पण तसे ते करणार नाहीत. तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशातला हा प्रकार आहे. नाना पटोले फक्त तोंडाची वाफ घालून गप्प बसणारे आहेत, असा टोलाही दरेकरांनी पटोलेंना लगावला आहे.
नाना पटोले काय म्हणाले होते? - राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत माझे बोलणे झाल्यावरसुद्धा त्यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदमध्ये सुद्धा राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊन राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका नाना पटोलेंनी राष्ट्रवादीवर केली होती.
'राष्ट्रवादीने धोका दिला' - पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अतुल लोंढे यांनी म्हटले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला धोका दिला. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत १०० टक्के खंजीर खुपसला आहे. राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी अनेक पंचायत समितीमध्ये भाजपसोबत संलग्न करून सत्ता स्थापन केल्या. त्यांनी भंडारा आणि गोंदियामध्ये देखील तोच प्रकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही भंडारा जिल्हा परिषदमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन केले असल्याचे लोंढे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Aurangabad Labour colony : लेबर कॉलनीतील तीनशेहून अधिक घरांवर बुलडोझर; रहिवासीयांना अश्रू अनावर