ETV Bharat / city

Anil Parab On Kirit Somaiya : ही नौटंकी गेल्या वर्षभरापासून, उत्तर देण्यास बांधील नाही; अनिल परब भडकले - किरीट सोमैया

ही नौटंकी गेल्या वर्षभरापासून चालू आहे. आणि त्याला उत्तर देण्यास मी काही बांधील नाही. त्याने यंत्रणेकडे तक्रार करावी, यंत्रणा याची चौकशी करेल आणि जे काही सत्य आहे, तो सत्य बाहेर येईल असे मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमैया यांना सुनावले आहे.

Anil Parab On Kirit Somaiya
अनिल परब भडकले
author img

By

Published : Jun 1, 2022, 12:18 PM IST

Updated : Jun 1, 2022, 3:27 PM IST

पुणे - भाजप नेते किरीट सोमैया यांनी केलेल्या आरोपावर परब म्हणाले की, मी किरीट सोमैया यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नाही. आजपर्यंत मी त्याला कुठलेही उत्तर दिलेले नाही. ज्या एजन्सी आहेत, जिथं त्यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारात जे अधिकारी मला प्रश्न विचारत आहेत त्याचे उत्तर आम्ही देत आहो. परंतु ही नौटंकी गेल्या वर्षभरापासून चालू आहे. आणि त्याला उत्तर देण्यास मी काही बांधील नाही. त्याने यंत्रणेकडे तक्रार करावी, यंत्रणा याची चौकशी करेल आणि जे काही सत्य आहे, तो सत्य बाहेर येईल असे मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केले ( Anil Parab On Kirit Somaiya ) आहे.

अनेकांची उपस्थिती - पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते राज्यातील पहिली शिवाई ई बसचे उद्घाटन ( Inauguration of Shivai e bus ) आणि पहिल्या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात ( Inauguration of Pune to Ahmednagar Electric Bus ) आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

अनिल परब यांची प्रतिक्रिया

वर्षभरात 3 हजार ई बसेसचे नियोजन - आज एसटी महामंडळाने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. पहिली बस ही पुणे ते नगर आणि नगर ते पुणे धावली होती. तशीच आज येथूनच राज्यातील पहिली ईबस शिवाई नावाने सोडली आहे. राज्यातील पर्यावरणाचा विचार करता एसटीने इलेक्ट्रॉनिक बस जास्तीत जास्त घेण्याचा आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा पर्याय निवडला आहे. त्याची सुरुवात ही आजपासून झाली आहे. आमचा जो इलेक्ट्रिक बस वाढवण्याचा जो आराखडा आहे. त्याची सुरुवात केली आहे. आजचा वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत शिवाई बस सुरू करण्यात आली आहे, असे यावेळी परब यांनी सांगितले. तसेच सरकारी योजनेत पहिले 150 बसेस या महामंडळात येणार आहेत. तसेच वर्षभरात 3 हजार बसेसचा नियोजन करण्यात आले आहे, असे देखील परब यावेळी म्हणाले.

बघू लढाईत पुढे काय होते - काल फडणवीस म्हणाले की, 2019 ला आम्ही समोरच्याचा डाव समजू शकलो नाही. त्यावर परब म्हणाले की बुद्धिबळ आहे. कोण कसा डाव खेळत हे डाव्याच्या शेवटी कळते. त्यामुळे यावर आता बोलणे योग्य राहणार नाही. बघू लढाईत पूढे काय होते ते असे देखील यावेळी परब म्हणाले.

हेही वाचा - Singer KK passes away: लोकप्रिय गायक केके काळाच्या पडद्याआड

Last Updated : Jun 1, 2022, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.