ETV Bharat / city

Pune Devotees go missing in Amarnath : अमरनाथ ढगफुटी.. पुण्यातील आठ भाविक बेपत्ता.. शोध सुरु

अमरनाथ येथील पवित्र अशा गुहेजवळ काल ढगफुटी ( Amarnath Yatra Cloudburst ) झाली. यावेळी दर्शनाला गेलेले पुण्यातील आठ भाविक बेपत्ता झाले ( Pune Devotees go missing in Amarnath ) आहेत. प्रशासनाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Pune Devotees go missing in Amarnath
अमरनाथ ढगफुटी.. पुण्यातील दोन भाविक बेपत्ता.. शोध सुरु
author img

By

Published : Jul 9, 2022, 12:41 PM IST

Updated : Jul 9, 2022, 2:12 PM IST

पुणे : दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेच्या पायथ्याशी असलेल्या यात्रा तळानजीक शुक्रवारी ढगफुटी झाल्याचे अधिकाऱ्यांनी ( Amarnath Yatra Cloudburst ) सांगितले. यात १६ जणांचा मृत्यूू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता भाविकांमध्ये पुण्यातील आठ भाविकांचा समावेश असल्याचे समोर आले ( Pune Devotees go missing in Amarnath ) आहे.

दोघेही नवरा- बायको : महेश भोसले आणि सुनिता महेश भोसले हे नवरा बायको दोघे परवा अमरनाथ यात्रेसाठी गेले असल्याची प्राथमिक माहिती असून, आत्ता या दोघांचा ही संपर्क होत नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्यासह इतर काही भाविकही बेपत्ता आहेत. अमरनाथ गुंफेच्या परिसरात काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटी झाली. प्रचंड पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालयांचे नुकसान झाले असून, तेथे बचाव मदतकार्य सुरू आहे.

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित : भारतीय लष्करही घटनास्थळी बचावकार्य करत आहे. जखमींना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी आणि रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सोनमर्ग येथील बालटाल बेस कॅम्प येथून अमरनाथ यात्रा ( amarnath yatra ) तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आज आम्हाला येथे तंबूत राहण्यास सांगण्यात आल्याचे एका भक्ताने सांगितले. तेथील हवामान अजूनही खराब आहे.

बचाव कार्यासाठी कुत्र्यांची मदत : प्रशासनासोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्याही मदतकार्यात गुंतल्या आहेत. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एलजी मनोज सिन्हा यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. काही काळासाठी प्रवास थांबवण्यात आला आहे. हवामान खात्याचा अहवाल आणि इतर परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. निलागर हेलिपॅडवर वैद्यकीय पथके उपस्थित आहेत. माउंटन रेस्क्यू टीम आणि इतर टीम बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून, अनेकांची सुटका करण्यात आल्याचा दावा बचावकार्यात सहभागी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला आहे. बचावकार्य लवकरच पूर्ण होईल, असेही सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. बचाव कार्यात शोध आणि बचाव कुत्रे देखील तैनात करण्यात आले आहेत. शरीफाबाद येथील दोन शोध आणि बचाव कुत्र्यांना हेलिकॉप्टरने पवित्र गुहेत नेण्यात आले आहे.

हेही वाचा : Amarnath Yatra Cloudburst : अमरनाथ गुहेच्या परिसरात ढगफुटी.. १६ मृत्युमुखी.. ४० जण बेपत्ता

Last Updated : Jul 9, 2022, 2:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.