पुणे - भारतीय नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलनांना तोंड फुटले. गेल्या दोन आठवड्यापासून याविरोधात ठिकठिकाणी मोर्चे सुरू आहेत.
आज शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयात या कायद्यावरून राष्ट्रवादी युवा काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. प्राचार्यांच्या कार्यालयासमोर दोन्ही संघटनांनी एकमेकांसमोर ठिय्या मांडला. यावेळी दोन्ही संघटनांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भारतीय नागरिकत्व कायद्याविरोधात आज राष्ट्रवादीने बंद पुकारला होता. याला विरोध दर्शवत भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन पुकारले. त्यामुळे काही काळ विद्यालय परिसरात तणावाचे वातावरण होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.