पुणे - शहरात 69 अशी ठिकाणी आहेत, जेथे कोरोनाचे सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. हा भाग प्रतिबंधित (ContInment) भाग म्हणून ओळखला जातो. याशिवाय शहरातील इतर भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी आहे. या भागातील संचारबंदी 4 मे पासून शिथिल केली जाणार आहे. या भागातील अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकाने उघडण्यास प्रशासनाच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय एकाच रस्त्यावरील अथवा गल्लीतील जीवनावश्यक वस्तूंखेरीज इतर फक्त पाच दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर संक्रमणशील क्षेत्रातील संचारबंदीत शिथिलता - corona lockdown
पुण्यात 69 प्रतिबंधात्मक ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. या क्षेत्रात मात्र संचारबंदी पूर्वीप्रमाणेच राहील. या परिसरातील केवळ अत्यावश्यक दुकानेच सकाळी 10 ते 2 या वेळेत सुरू राहतील. याशिवाय या परिसरात लागू असलेले इतर निर्बंधही पूर्वीसारखेच लागू असतील..