ETV Bharat / city

लहानवयातच बचतीची सवय लावावी: श्रीपाद नाईक - श्रीपाद नाईक

पाटो-पणजी येथील संस्कृती संकुलात शनिवारी झालेल्या "प्रधानमंत्री श्रम योगी मन-धन" योजनेच्या कार्यक्रमात केंद्रीय आयुष तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

Goa
श्रीपाद नाईक
author img

By

Published : Nov 30, 2019, 7:58 PM IST

पणजी- लहान वयातच बचतीची सवय लावली तर कुटुंबाच्या गंभीर प्रसंगी ही बचत कामाला येते. वयाच्या 18 वर्षांपासून ते 40 वर्षापर्यंत 55 ते 200 रुपये महिना भविष्यनिधी योजनेत बचत करण्याची सवय लावल्यास निवृत्तीनंतर मासिक किमान 3 हजार रुपये मिळतील, असे आवाहन केंद्रीय आयुष आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

पाटो-पणजी येथील संस्कृती संकुलात शनिवारी झालेल्या 'प्रधानमंत्री श्रम योगी मानधन' योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नाईक म्हणाले की, केंद्र सरकारची ही एक चांगली योजना 6-7 महिन्यांआधी राज्यात सुरु होणार होती. आता ती प्रत्येक जिल्ह्यात सुरु केली जाते, हे पाहून आपल्याला आनंद होत आहे. आपल्या कुटुंबच्या गरजेला, आजारपणाला वा भविष्यातील अडचणीला उपयोग पडणारी ही योजना असून, त्याचा आपण सर्वांनी फायदा करून घ्यायला हवा. आज जागतिक मंदी सुरु असताना सामान्य व गरिबाची गरज भागवण्यासाठी ही योजना वेळेवर उपयोगी पडणार यात शंका नाही.

नाईक म्हणाले, की आपण खासगी वा सरकारी कुठेही काम करत असलात तरी ही योजना आपल्याला कामी येणार आहे. आपल्या 60 वर्षानंतर मुलं-बाळं आपली देखभाल करत नसतील तर ही योजना काही प्रमाणात हातभार लावेल. आपण मोठया संख्येने या कार्यक्रमला आलात व प्रतिसाद दिलात, हे पाहून आनंद झाला. भविष्य उज्ज्वल ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी केंद्रच्या योजनेचा जरूर फायदा घ्यावा.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा कामगार व रोजगार खात्याचे आयुक्त विकास गावणेकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका , महसूल खात्याचे सचिव संजय कुमार, उपसंचालक एन. एम. ओझा व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Intro:पणजी : लहान वयातच बचतीची सवय लावली तर कुटुंबाच्या गंभीर प्रसंगी ही बचत कामाला येते. वयाच्या 18 ते 40 व्या वर्षापासून 55 ते 200 रु. महिना भविष्यनिधी योजनेत बचत करण्याची सवय लावल्यास निवृत्तीनंतर मासिक 3 हजार रुपये मिळतील, असे आवाहन केंद्रीय आयुष्य तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. Body:पाटो - पणजी येथील संस्कृती संकुलात शनिवारी झालेल्या "प्रधानमंत्री श्रम योगी मन -धन" योजनेच्या कार्यक्रम ते बोलत होते. नाईक म्हणाले, की केंद्र सरकारची ही एक चांगली योजना 6-7 महिन्या आधी राज्यात सुरु होणार होती. आता ती प्रत्येक जिल्हात सुरु केली जाते, हे पाहून आपल्याला आनंद होत आहे. आपल्या कुटुंबच्या गरजेला, आजारपणाला वा भविष्यातील अडचणीला उपयोग पडणारी ही योजना असून, त्याचा आपण सर्वांनी फायदा करून घ्यायला हवा. आज जागतिक मंदी सुरु असताना सामान्य व गरीबाची गरज भागवण्यासाटी ही योजना वेळेवर उपयोगी पडणार, यात शंका नाही.
नाईक म्हणाले, की आपण खासगी वा सरकारी कुठेही काम करत असलात तरी ही योजना आपल्याला कामी येणार आहे. आपल्या 60 वर्षा नंतर मुलं -बाळ आपली देखभाल करत नसेल, तर ही योजना काही प्रमाणात हातभार लावेल. आपण मोठया संख्येने या कार्यक्रमला आलात, व प्रतिसाद दिलात, हे पाहून आनंद झाला. भविष्य उज्वल ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी केंद्रच्या योजने चा जरुर फायदा घ्यावा.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा कामगार व रोजगार खात्याचे आयुक्त विकास गावणेकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका , महसूल खात्याचे सचिव संजय कुमार, उपसंचालक एन एम ओजा व अन्य मान्यवर उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.