पणजी - लोकसभेसाठी आज तिसऱ्या टप्प्यात गोव्यातील दोन जागांसाठी तर गोवा विधानसभेच्या तीन जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत उत्तर गोवा मतदारसंघात १३.१८ टक्के तर दक्षिण गोवा मतादारसंघात १३.१२ टक्के मतदान झाले.
आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये विधानसभेच्या तीन जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत शिरोडामध्ये १३.१८ टक्के, म्हापसामध्ये १४.४७ टक्के तर मांद्रे १३.०५ टक्के मतदान झाले होते.गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या गावी साखळी मतदारसंघातील कोठंबी येथे मतदान केले. तर उत्तम गोवा भाजप उमेदवार आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रायबंदर येथे, दक्षिण गोवा भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर यांनी फोंडा येथे मतदान केले. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी दोनापावला येथे मतदान केले. उत्तर गोवा काँग्रेस उमेदवार गिरीश नाईक यांनी ही मतदान केले.
दरम्यान, विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघात मतदारांनी मोठ्यासंख्येने रांगा लावल्या आहेत.