ETV Bharat / city

गोव्यात कोविड मृतांच्या वारसांना 2 लाखांची तर बेरोजगारांना 5 हजार रुपयांची मदत - assistance to unemployed in Goa

गोव्यात मागच्या काही महिन्यांपासून कोविडमुळे राज्यातील अर्थव्यवस्था पार डबघाईला आली. यात अनेकांचे रोजगार गेले तर काहीजणांचा मृत्यू ही झाला. कोविडमध्ये मृत्युमुखी पावलेल्या वारसांना सरकारच्या वतीने 2 लाख रुपयांची, तर बेरोजगारांना पाच हजाराची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मदत करण्यात आली आहे.

assistance of Rs 2 lakh to the heirs of Covid deceased and Rs 5,000 to the unemployed, In Goa
गोव्यात कोविड मृतांच्या वारसांना 2 लाखांची तर बेरोजगारांना 5 हजार रुपयांची मदत
author img

By

Published : Sep 23, 2021, 4:09 PM IST

पणजी (गोवा) - कोविडमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, अशा नागरिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे 2 लाखाची मदत करण्यात आली आहे. या मदतीचे धनादेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पीडितांच्या कुटुंबीयांना बुधवारी सुपूर्त करण्यात आले. तसेच कोविड काळात उत्पनाचे साधन नसणाऱ्या नागरिकांनाही ५ हजार रुपयांची मदत सरकारतर्फे करण्यात आली. बुधवारी पणजीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजकल्याण मंत्री मिलिंद नाईक तसेच या खात्याचे अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे कॉंग्रेसला प्रत्युत्तर -

काँग्रेस सरकारच्या काळात राज्याची तिजोरी ओसंडून वाहत असताना आलेल्या संकटात सरकारने नागरिकांना तुटपुंजी मदत केली. मात्र, कोविड काळात सरकारचे उत्पन्न ९० टक्क्यांनी घसरले तरी देखील सरकार पीडितांना मदत करत आहे आणि ही मदत काँग्रेसच्या सरकारपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. त्यामुळे सरकार करत असलेल्या मदतीची खिल्ली उडविण्यापूर्वी आपण काय केले याचा तपास काँग्रेसने करावा असे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेससह विरोधकांना दिले आहे.

तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक खर्च -

राज्यात कोविडमुळे मृत्यू पावलेल्या 349 नागरिकांच्या वारसांना कोविड मृत्यू रिलीफ फंडाच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली आहे. यासाठी राज्यातील 471 नागरिकांनी अर्ज केले होते त्यापैकी 349 अर्ज मंजूर करण्यात आले होते.

पारंपरिक व्यावसायिकानाही मदत -

पारंपरिक व्यवसायात कोविडचा फटका बसलेल्या 120 नागरिकांना 5 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. यासाठी २६१८ नागरिकांनी अर्ज केला होता, मात्र त्यातील ७२२ अर्जाची पडताळणी करून पात्र १२० जणांना ही मदत देण्यात आली आहे.

हेही वाचा - गोव्याचे निवडणूक प्रभारी फडणवीसांनी घेतल्या नाराज आमदारांच्या गाठीभेटी; काँग्रेसमध्येही केली चाचपणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.