ETV Bharat / city

leopard attack नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालके गंभीर जखमी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते दुगारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात (leopard attack) 2 बालके गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना आज, 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास घडली.

children injured leopard attack Trimbakeshwar
बिबट हल्ला दोन बालके जखमी कळमुस्ते
author img

By

Published : Nov 20, 2021, 3:53 PM IST

Updated : Nov 20, 2021, 6:32 PM IST

नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते दुगारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात (leopard attack) 2 बालके गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना आज, 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास घडली.

हेही वाचा - Farm Laws Repealed : कृषी कायदे रद्दच्या घोषणेनंतर नाशकात शेतकरी संघटनांकडून जल्लोष

भिवाजी गोविंद सोहळे (वय 12), विशाल सुरूम (वय 8) हे दोघे पहाटे 6 वाजता लघुशंकेसाठी घराबाहेर आल्यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र, त्यांनी आरडाओरडा केल्याने लोकांना पाहताच बिबट्या पळून गेला. दोघांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमींना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

त्र्यंबकेश्वरच्या वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आम्ही अनेक दिवसांपासून करत आहोत. मात्र, त्याकडे वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस भगवान मधे यांनी केला. इगतपुरी तालुक्यात बिबट्याचा हैदोस थांबला असे वाटत असताना बिबट्याने आपला मोर्चा त्र्यंबकेश्वर तालुक्यात वळवला असल्याचे दिसून येते.

बिबट्याचे हॉटस्पॉट

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यांतून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष म्हणून बिबट्यांना शेळ्या - मेंढ्या तसेच, भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात जवळपास 200 हून अधिक बिबटे असल्याचे समोर आले आहे. अनेकदा काही बिबटे भक्षाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा - VIDEO : काय आहे देवदिवाळी? त्रिपुरारी पौर्णिमेला साजरी केली जाते देवदिवाळी

Last Updated : Nov 20, 2021, 6:32 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.