ETV Bharat / city

बदल्या रद्द करा; सफाई कर्मचाऱ्यांचे नाशिक मनपासमोर ठिय्या आंदोलन

author img

By

Published : Aug 6, 2020, 7:56 PM IST

नाशिक पालिकेच्यावतीने सुमारे 700 सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या बदल्या कामगारांवर अविश्वास दाखवून ते ठेकेदारांना पोसण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप सफाई कर्मचारी विकास युनियनच्यावतीने करण्यात आला आहे.

Sweepers agitation
सफाई कर्मचाऱ्यांचे नाशिक मनपासमोर ठिय्या आंदोलन

नाशिक - महानगरपालिकेने ७०० सफाई कर्मचाऱयांच्या बदल्या या ठेकेदारांना पोसण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप करत गुरुवारी सफाई कर्मचारी विकास युनियनच्यावतीने आंदोलन करण्यात आले. नाशिक महापालिकेबाहेर करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनात शहरातील अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आले आहे.

नाशिक पालिकेच्यावतीने सुमारे 700 सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या बदल्या कामगारांवर अविश्वास दाखवून ते ठेकेदारांना पोसण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप सफाई कर्मचारी विकास युनियनच्यावतीने करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाने या बदल्या त्वरित रद्द कराव्यात, सफाई आऊटसोर्सिंग ठेकेदारी रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी नाशिक महानगरपालिके बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी संतप्त सफाई कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देत या बदल्या त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी केली. तसेच घोषणाबाजी करत बदल्याचा निषेध व्यक्त केला. कोरोनाच्या काळात बदल्या करण्याची मुभा नसताना देखील मनपा प्रशासन एकाच वेळी ७०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून सफाई कामगारांवर अन्याय करून ठेकेदार पोसण्यासाठी या बदल्या करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.

दरम्यान, पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आदेश मागे घेत सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्वरित रद्द केल्या नाहीतर येत्या काळात सफाई कर्मचारी विकास युनियनच्यावतीने काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. यामुळे आता मनपा प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.