नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे सर्वत्र पालन केले जात असल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसून आले. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे नाशकातील अनेक शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची रेलचेल दिसून येत आहे.
हेही वाचा... COVID-19 LIVE : मुंबई अन् यवतमाळमध्ये आढळले नवे रुग्ण, राज्यातील एकूण संख्या ३८ वर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृहे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन नाशिकमध्ये होताना दिसत आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे काही शाळा महाविद्यालयांत परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची रेलचेल दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयाबाबत शासनाने कोणत्याही सूचना दिल्या नसल्याने याबाबत शिक्षक आणि विद्यार्थ्यांत काही संभ्रम दिसुन येत आहे.
हेही वाचा... 'चिकन खाल्ल्याने कोरोना होतो,' अफवेचा फटका, कोंबड्यांच्या तब्बल तीन लाख पिल्लांसह दोन लाख अंडी केली नष्ट
नाशिकमध्ये आतापर्यंत 23 कोरोना सदृश्य रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 20 जणांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर, तीन जणांचे रिपोर्ट अद्यापही येणे बाकी आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 92 प्रवाशांची नियमित तपासणी केली जात आहे.