ETV Bharat / city

Nashik News ब्लँकेटची झोळी करून गर्भवती महिलेला नेलं रुग्णालयात नाशिकमधील मन सुन्न करणारे दृश्य - Pregnant Woman Has Been Admitted

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा Hedpada of Nashik District येथील एका गर्भवती महिलेला Pregnant women चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Video viral on social media होत आहे

pregnant woman has to walk three kilometers through a bag
गर्भवती महिलेला चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट
author img

By

Published : Aug 13, 2022, 3:33 PM IST

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा Hedpada of Nashik District येथील एका गर्भवती महिलेला Pregnant women चक्क झोळीद्वारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Video viral on social media होत आहे.

ब्लँकेटची झोळी करून गर्भवती महिलेला नेलं रुग्णालयात नाशिकमधील मन सुन्न करणारे दृश्य

भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Amrit Mahotsav साजरा करतोय तसेच आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी नागरिकांची आजही मूलभूत सुविधांसाठी फरफट सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा येथील वैशाली बेडकोळी या गर्भवतीला चक्क झोळी करून तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावे लागले. मुख्य रस्त्यापासून आठ किलो मीटरवर असलेल्या आंबोली येथील शासकीय रुग्णालयात Primary Health Center Amboli या महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावाजवळ हेदपाडा हे गाव आहे 300 लोक वस्ती असलेल्या हेदपाडा गावातील लोकांना दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची समस्या भेडसावत असते या गावात जाण्यासाठी रस्ता मंजूर असतानाही नेहमी डांबरीकरण ऐवजी मातीचा रस्ता तयार केला जातो त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय होतो दुचाकी सोडा मात्र या रस्त्याने चालणे देखील कठीण होते एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे आजही आदिवासी ग्रामीण भागातील वाड्या-वस्ती पर्यंत मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत अनेक ठिकाणी आजही थेट रुग्णवाहिका पोहचत नाही त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते.

मूलभूत सुविधांची अवकाळा
आमच्या गावात वैद्यकीय सुविधा नसल्याने तीन वर्षांपूर्वी एका 17 वर्षीय युवतीला सर्पदंश झाल्याने तिला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला होता,विना उपचार मृत्यूच्या घटना नेहमीच्याच आहेत आमच्या गावातील लोकांना वैद्यकीय सुविधा तसेच रस्ते लाइट पाणी या मूलभूत सुविधा कधी मिळणार असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहे.

हेही वाचा : Samruddhi Mahamarg Nagpur : ठरलं ! समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला १५ ऑगस्टचा मुहूर्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.