ETV Bharat / city

नाशिक : चिमुकलीला सोडून आईने भर पावसात काढला पळ, इगतपुरीतील धक्कादायक घटना

इगतपुरी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या घाटनदेवी मंदिर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास चार ते आठ दिवसाच्या नवजात बाळाला भर पावसात येथील मंदिराच्या बाजूला टाकून अज्ञात आई फरार झाली.

चिमुकलीला सोडून आईने भर पावसात काढला पळ
चिमुकलीला सोडून आईने भर पावसात काढला पळ
author img

By

Published : Jul 23, 2022, 7:52 AM IST

नाशिक: एका मातेने गाेंडस चार ते आठ दिवसांपूर्वीच जन्मलेल्या मुलीला भर पावसात उघड्यावर साेडून पळ काढल्याची घटना इगतपुरीतील घाटनदेवी परिसरात उघडकीस आली. पाेलिसांनी या बाळाला ताब्यात घेत नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू - आजही समाजात मुलींना नाकारले जात असल्याच्या घटना समोर येताना दिसतात. मुलगी नकोशी झाल्याने आईने पाेटच्या गाेळ्याला घाटनदेवी मंदिर परिसरात भर पावसात टाकून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दि.२२ समोर आला.

इगतपुरी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या घाटनदेवी मंदिर परिसरात ही घटना समोर आली आहे. जवळपास चार ते आठ दिवसाच्या नवजात बाळाला भर पावसात येथील मंदिराच्या बाजूला टाकून अज्ञात आई फरार झाली. मंदिर परिसरात बुधवारी रात्री ८ च्या सुमारास जितेश महेश चारमिया रा. गांधीनगर, इगतपुरी यांना बाळ रडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांचे लक्ष गेले. त्यांनी आजूबाजूला पहिले. पण त्यांना बाळाच्या आजूबाजूला कोणी दिसले नाही. त्यांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते सापडले नाही.

बाळ खूपच रडत असल्याने त्यांनी त्याला उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी लिलके यांनी उपचार करून इगतपुरी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती कळताच इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे दाखल झाले. पाेलीस इगतपुरी पोलीस या नकोशीच्या मातेचा शोध घेत आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात तिच्यावर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा - मानसिक आजारी मुलीची आईने केली हत्या; आत्महत्येचा रचला बनाव, शवविच्छेदनातून सत्य उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.