ETV Bharat / city

सहा महिने पुरेल इतका अन्नधान्य साठा उपलब्ध, संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ - Food stocks available for up to six months

सहा मिहिने पुरेले एवढे अन्नधान्य उपलब्द असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. अन्नधान्य,भाजीपाला किंवा मटण मंच्छी यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळणारी दुकाने दवाखने, मेडिकल आदि सेवा संचारबंदीतून वगळण्यात आल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Minister Chhagan Bhujbal said that foodgrains were available for six months
ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Mar 24, 2020, 11:03 PM IST

नाशिक - सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याने नागरिकांनी काळजी करू नये. अन्नधान्य, भाजीपाला किंवा मटण मच्छी यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळणारी दुकाने तसेच दवाखाने, मेडिकल आदी सेवा संचारबंदीतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे यासेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी शासन प्रशासनास नागरीकांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. त्यासाठी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दी करू नये, असे आवाहन अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

सहा महिने पुरेल इतका अन्नधान्य साठा उपलब्ध, संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ

भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केट बंद केलेले नाहीत. त्या ठिकाणी माथाडी कामगार कामावर जाणार असेल तर त्यासंबंधी पोलिसांनी सारासार विचार करून त्यांना कामावर जाऊ देण्याचे सहकार्य पोलीस प्रशासन करेल. शेतकरी दखील थेट ग्राहकांना भाजीपाला विकू शकतात, मात्र, गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार व सातत्याने सुरू ठेवण्यासाठी पोलीस व सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी सुद्धा संचारबंदी काळात अनावश्यक बाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना एकाच व्यक्तिने जावे, संबंधित दुकानांवर जास्त गर्दी होणार नाही याची काळजी देखील नागरिकांनी घ्यावी. नागरिकांनी कोरोना विषाणूची भीती न बाळगता, सतर्कतेने, स्वच्छता ठेवून व एकमेकांपासून लांब राहून या परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे.

निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी गर्दीच्या ठिकाणी लोकांना ठराविक अंतरावर उभे करणे, निवडक थोड्याप्रमाणात रांगा लावून देणे असे सहज स्वरूपाचे मौलिक सहकार्य केल्यास वातावरण सुरळीत होण्यास मदत होईल.

किराणा किंवा इतर जीवनावश्यक वस्तू जास्त भावाने विकल्या जाण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून संबंधित ग्राहक संरक्षण, पोलीस किंवा महसूल अशा यंत्रणांनाकडे त्वरित तक्रार करावी. जीवनावश्यक वस्तूंमध्ये मास्क आणि सॅनिटायझर यांचादेखील समावेश असल्याने यात काळाबाजार झाल्यास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.