ETV Bharat / city

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षा महाराष्ट्राला अधोगतीकडे नेले - प्रविण दरेकर - प्रविण दरेकर नाशिक दौरा

उध्दव ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले असून या दोन वर्षात गुन्हेगारी वाढली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, प्रादेशिक असमतोल वाढला,या सरकारच्या निम्या मंत्रीमंडळावर गुन्हे दाखल झाले. राजकारणाचे गुन्हेगारी करण वाढले असून देशात क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

prain darekar nashik tour
prain darekar nashik tour
author img

By

Published : Nov 29, 2021, 4:08 AM IST

नाशिक - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारचा नावलौकिक, पारदर्शी सरकार, विकासाचे सरकार,प्रादेशिक समतोल ठेवून पुर्ण महराष्ट्राचा विकास करणारे सरकार म्हणून नाव लौकिक मिळविला होता. उध्दव ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले असून या दोन वर्षात गुन्हेगारी वाढली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, प्रादेशिक असमतोल वाढला,या सरकारच्या निम्या मंत्रीमंडळावर गुन्हे दाखल झाले. राजकारणाचे गुन्हेगारी करण वाढले असून देशात क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

नाशिक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ -

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून नाशिकमध्ये चार दिवसात प्रविण काकड, राजेश शिंदे व अमोल इघे या तिघांची निघृण हत्या झाली. आजही काही ठिकाणी भोसकल्याच्या घटना घडल्या आहेत.भाजप सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघेचा खुन राष्ट्रवादी पक्षाचा राजकिय वरदहस्त असलेल्या विनोद उर्फ विनायक बर्वे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी सकाळी ७ वा.खुलेआम तिक्ष हत्याराने भोसकुन खुन केला. या हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.नाशिक जिल्याचे छगन भुजबळ पालकमंत्री झाल्यापासुन नाशिक शहरात गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढली असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.अमोल इघेची केस फास्ट टॅ्रक कोर्टात चालवावी, गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

इंधनाचे दर कमी करावे -

मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांचा पालकमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा,पेालीस आयुक्त दिपक पांडे यांची त्वरीत बदली करावी अशी मागणी दरेकर यांनी केली. उध्दव ठाकरे सत्ते नव्हते तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी ५० हजार भरपाई दयावी अशी मागणी करत होते.तीच मागणी सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री झालेल्या उध्दव ठाकरे यांनी पुर्ण करावी.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना पिक विमा व नुकसान भरपाई त्वरीत मिळत होती.ठाकरे सरकारने हेक्टरी १० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित केली ती अदयाप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.शेतकऱ्यांना विज पंपाला विज मिळत नाही व विज बिले भरली नाही म्हणून शेतकऱ्यांची विज तोडली जाते.फडणवीस सरकार असतांना जाणते राजे शरद पवार यांनी शेतकऱ्यानी विज बिले भरू नये अशा प्रकारची भाषणे जाहिर सभांमधून केली होती.त्यांचे आता काय झाले याचे उत्तर जाणत्या राजांनी दयावे.पेट्रोल,डिझलेचे दर वाढले म्हणून गांभिर्याने दखल घेवून केंद्रातल्या मोदी सरकारने डिझेल प्रती लिटर १० रुपये व पेट्रोल ५ रुपयांनी दर कमी केले आहे.महाराष्ट्राखेरिज इतर राज्यांनी पेट्रोल,डिझेल वरील कर कमी केल्यामुळे इतर राज्यांत पेट्रोल डिझेलचे दर मोठया प्रमाणात कमी झाले आहे.याउलट महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी न केल्यामुळे दर वाढलेले आहेत.कोणतीही मागणी नसतांना उध्दव ठाकरे सरकारने विदेशी दारूवरील कर १५० टक्यांनी कमी केला आहे.

सरकारचे दोन वर्ष हे केवळ जनतेला फसविण्यात गेली -

गृहमंत्री अनिल देशमुख व पेालीस अधिकारी परमवीर सिंग फरार होते.कायदाचा बडगा उगारल्यामुळे आता परमवीर सिंग नाईलाजाने कोर्टापुढे हजर झाले आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या शारिरीक व मानसीक त्रासामुळे पुजा चव्हाण या निष्पाप मुलीने आत्महत्या केली,तीचा व्हिडीओ व्हायरल झाला व पुरावे सापडल्यामुळे या मंत्र्याला राजीनामा दयावा लागला.महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता काळात सुरु असलेले महत्वाचे विकास प्रकल्प उध्दव ठाकरे सरकारने काही रद्द केले तर काहींना स्थगिती दिली.महाराष्ट्रात मंत्री व अधिकारी यांची भ्रष्टाचाराची मोठी साखळी झाली असून सचिन वाझे हे फक्त हिमनगाचे टेाक आहे.राज्यात अनेक सचिन वाझे तयार झाले असून भ्रष्टाचाराचे कोटीच्या कोटी उड्डाने उडत आहेत. भंडारा,ठाणे,वसई व नगर मध्ये दवाखान्यांना लागलेल्या आगीत अनेक बालके दगावली.याउलट मोदी सरकारने वेळोवळी महाराष्ट्राला भरीव मदत केली आहे तसेच कोरोना काळात मोदी सरकारने ८५ कोटी लोकांना मोफत अन्नध्यान्य पुरविले मार्च २०२२ पर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे.मोफत कोरोना लसी करणात महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरेसा लसींचा साठा उपलब्ध करून दिल्याने महाराष्ट्र लसीकरणात वरच्या क्रमांकावर आहे.जगात सर्वाधिक मोफत लसीकरण केलेला देश म्हणून भारताचे नाव घेतले जाते.कोरोना काळात विदेशातून ऑक्सिजन टॅकर विमानाने आणून मोदी सरकारने कोरोना रुग्णांना मोठी मदत केली होती.सॅनिटायझर व मास्कची देशातच मोठया प्रमाणावर निर्मिती करून आत्मनिर्भर म्हणून भारत नावारुपाला आला.केंद्रातले मोदी सरकार शेतकर्यांयच्या बँक खात्यांवर मदत म्हणून दरवर्षी ६ हजार रुपये देते. केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेमुळे गरीबांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी उभारून हजारो रुग्णांना वैद्यकिय मदत केली होती तो कक्ष ठाकरे सरकारने बंद केल्यामुळे गोर गरीबांचे हाल होत आहेत.सदयास्थितीत महाराष्ट्रातील काही उदयोगधंदे ठप्प झाले आहे तर काही उदयोजक स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत.ठाकरे सरकारचे दोन वर्ष हे केवळ जनतेला फसविण्यात गेली आहेत.त्यामुळे जनतेची फसवणूक करणारे सरकार म्हणून या सरकारचा उल्लेख केला पाहिजे.

आंधळे मुके व बहिरे सरकार म्हणून या सरकारचा उल्लेख -

त्रिपुरा राज्यात न घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात नांदेड, मालेगांव,अमरावतीमध्ये जाळपोळ, हिंसा,लुट, हिंदुवर अत्याचार मोठया प्रमाणात करण्यात आले.रजा अकादमीच्या कार्यालयात आक्षेपार्य पत्रके व काही कागदपत्रे सापडली. तरी अदयाप संबंधीतावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने मराठा व ओबीसी समाजाची घोर फसवणूक केलेली आहे.इंपिरीकल डाटा तयार करण्याकरता ठाकरे सरकारने केवळ ४५० कोटी रुपये उपलब्ध न केल्यामुळे आरक्षण रद्द झाल्याची टिका दरेकर यांनी केली.दोन वर्ष या ठाकरे सरकारला पुर्ण झाले पण हे सरकारच अस्तित्वातच नाही.सरकार कोण चालवत आहे हा संशोधनाचा विषय आहे.कारण मुख्यमंत्रीच मंत्रालयात जात नाही.महाराष्ट्रात पुन्हा विकासाकडे न्यायचे असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही.दोन वर्षात विकासाबाबत महाराष्ट्राची अधोगती झाली आहे.आंधळे मुके व बहिरे सरकार म्हणून या सरकारचा उल्लेख करावा लागेल.

आव्हाड यांनी बेताल वक्तव्ये करू नये -

जितेंद्र आव्हाड यांनी बेताल वक्तव्ये करू नये.त्याच्याविरुध्द बोलणार्याना त्यांनी स्वत:च्या बंगल्यावर आणून बेदम मारहाण प्रकरणी त्यांना अटक केव्हा झाली व सुटका केव्हा झाली हे समजलेच नाही.नाशिकमध्ये पोलीस व सत्ताधार्यांच्या पाठबळामुळे गुन्हेगारी वाढली आहे.नाशिकमध्ये पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरली आहेत. आगामी नाशिक मनपा निवडणूकीत भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 'Omicron Variant'ची दहशत, टाळेबंदी नको असेल तर नियम पाळा - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.