नाशिक - राज्य सरकार 'मिशन बिगिन अगेन'वर ठाम असून नाशिकमध्ये लाॅकडाऊन पुन्हा सुरू शक्य नाही. याचे काऱण लोकांचा संयम संपत चालला असून आर्थिक चणचणीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोणीही दादागिरी करुन दुकाने बंद ठेवू नये, असा सज्जड दम पालकमंत्री भुजबळ यांनी स्वयंघोषित नेत्यांना दिला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाछी सगळे व्यवसाय हळूहळू पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून लाॅकडाऊन हवे असेल तर पंतप्रधान मोदींना सांगा, असा टोलाही भुजबळ यांनी भाजपचे नाव न घेता लगावला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी पालकमंत्री भुजबळ आणि व्यापारी संघटनांची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते, महाराष्ट्र चेंबर आँँफ काॅमर्सने वेळ मागितली म्हणून त्यांच्यासोबत आज बैठक घेतली. सम-विषम नियम काढुन टाकावा, या व्यापारी वर्गाच्या मागणीवर अजोय मेहता यांच्याशी फोनवर बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊन हठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा लाॅकडाऊन करणे अशक्य आहे. मागील काळात अर्थचक्र बंद पडले होते. लोकांकडे पैसे नाही आणि तरिही सर्व बंद करायचे असेल, तर मोदींना सांगा. सगळा देश बंद करु, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
हेही वाचा... "बिहार रेजिमेंटने शौर्य गाजवले.. मग इतर रेजिमेंट काय तंबाखू चोळत होत्या का?"
सरकारने सगळ दुकाने सुरु केली असून कोणीही दादागिरी करायची नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दुकाने किती वेळ सुरु ठेवायची, याचा निर्णय व्यापार्यांनी घ्यावा. पण जीवनावश्यक दुकाने सुरु ठेवावीच लागतील. लाॅकडाऊन हटल्यावर बाहेरुन लोक नाशकात आले. त्यामुळे रुग्ण वाढत आहे. खासगी रुग्णालयात दोन दिवसात डॅश बोर्ड लावला जाईल. जेणेकरुन रुग्णालयात किती जागा आहे, हे समजेल आणि याबाबत गोंधळ उडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका...
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. शरद पवारांवर बोलणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे. कोरोना आणि इतर सर्व संकटातही ते एखाद्या तरुणासारखे काम करत आहे. प्रकाशझोतात येण्यासाठी काही लोक असे उद्योग करतात, असा टोलाही त्यांनी पडळकर यांना लगावला आहे.