ETV Bharat / city

अवकाळी संकट! दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसासोबत गारपीट, पाहा व्हिडिओ

अचानक पडलेल्या या गारांच्या पावसाने परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

hailstorm in Dindori
दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसासोबत गारपीट
author img

By

Published : May 13, 2020, 5:45 PM IST

दिंडोरी (नाशिक) : एकीकडे कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल सुरूच आहेत. त्यातच बुधवारी दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे अगोदरच कोरोनाने हैराण असलेल्या नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

हेही वाचा... संघर्ष जगण्यासाठीचा : कुटुंबाचा भार खांद्यावर घेत ओढतोय 'गाडा', सांगा कसं जगायचं...?

व्हिडिओ : दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसासोबत गारपीट...

दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गटातील अस्वलीपाडा, अहिवंतवाडी, चामदरी, पवारणीचा पाडा कोल्हेर, पिंपरी अंचला, चौसाळे, पांडाणे, माळे दुमाला, अंबानेर, पुणेगाव, सारसाळे परीसरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसासह काही ठिकाणी गारपीट देखील झाली. त्यामुळे कांदा, गहू, बाजरी आणि द्राक्षांच्या लहान फुटव्याला गारांचा मार लागला असून या पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गारपीटसह झालेल्या मुसळधार पावसाने पांडाणे, पुणेगाव, अंबानेर, चौसाळे आणि पिंगळवाडी भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. सकाळपासूनच आकाशात ढग गोळा झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. त्यात सायंकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावाधाव झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.