नाशिक - येथील संदीपगर येथील शाळेत सोमवारी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आझादीका अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून (1962)च्या युद्धात सहभागी झालेले चंद्रभान मालुंजकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रगीत म्हणत असताना माजी सैनिक मालुंजकर यांना हृदय विकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला.
हृदय विकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले - मृत्यू कधी, कुठे येईल हे कोणीच सांगू शकत नाही. अशीच एक घटना नाशिक मध्ये घडली आहे, नाशिकच्या संदीपगर येथील शाळेत सोमवारी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आझादीका अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1962 च्या युद्धात सहभागी झालेले चंद्रभान मालुंजकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अशात राष्ट्रगीत म्हणत असतानामाजी सैनिक मालुंजकर याना हृदय विकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओ
देखील समोर आला आहे.
हेही वाचा - Ministerial Distribution : एकनाथ शिंदे सरकारचे संभाव्य खातेवाटप; अशी असेल मंत्र्यांवर जबाबदारी