नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने 9 वी ते 12 वी पाठोपाठ आज 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेकडूनही विद्यार्थ्यांची काळजी घेत विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बांधनकारक करण्यात आले आहे. मात्र आज पहिल्या 5 वी ते 8 वी च्या वर्गात केवळ 25 टक्के उपस्थिती दिसून आली. पालकांनी विद्यार्थ्यांना निर्धास्त शाळेत पाठवावे, असं आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.
कोरोना प्रादुर्भाव असल्याने गेल्या 10 महिन्यांपासून सरकारी आणि खाजगी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असून कोरोना लसीकरणाला देखील सुरवात झाली आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये सर्वच उद्योग धंदे, व्यवसाय सुरू झाले असून अनलॉकच्या शेवटच्या टप्प्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आज 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र आज पाहिल्या दिवशी नाशिकमधील शाळांमध्ये केवळ 25 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली.
नाशिक जिल्ह्यात आजपासून 5 वी ते 7 वीचे वर्ग सुरू करण्यात आलेत. मात्र आज पहिल्या दिवशी केवळ 25 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी बहुतांशी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. विद्यार्थ्यांना लसीकरण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू, अशी भूमिका काही पालकांनी घेतल्यामुळे नाशिक शहरातील 50 टक्के खासगी शाळेमधील वर्ग पाचवी ते आठवीचे वर्ग अद्याप सुरू झाले नाहीत.
शाळांकडून विद्यार्थ्यांची विशेष काळजी -
नाशिक जिल्ह्यात शासकीय तसेच खाजगी शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले असून. याला विद्यार्थ्यांच्या चांगला प्रतिसाद मिळत असून 80 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे. तसेच सर्वच शाळा प्रशासनाच्या वतीने सुद्धा विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली जात असून. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे दररोज तापमान घेणे, हॅन्ड सॅनिटाईझ करणे, मास्क वापरणे तसेच वर्गात बसताना सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यात येत आल्याने शाळा सुरू होऊन पंधरा दिवसानंतर सुद्धा एकही विद्यार्थीला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं नसल्याने पालकांनी 5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असा आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.
मित्र भेटल्याचा आनंद -
शाळा बंद होती तरी आम्हाला शाळेकडून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होतं. त्यामुळे आमच्या अभ्यासावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र आता खऱ्या अर्थाने शाळा सुरू झाल्याने आम्हाला आनंद होत आहे. तसेच आता अभ्यासासोबतच शाळेतील मित्र, शिक्षक भेटल्याचा अधिक आनंद झाला असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले.