ETV Bharat / city

नाशिकच्या सीडीओ मेरी शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; दोघेही मुले दहावीत शिकणारी - दोन शाळकरी मुंलांची सिनेस्टाईल हाणामारी

नाशिकमधील शाळकरी मुलांचा एक हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

nashik
नाशिकमध्ये दोन शाळकरी मुंलांची सिनेस्टाईल हाणामारी
author img

By

Published : Feb 11, 2021, 6:12 PM IST

नाशिक - अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारी कृत्य ही बाब दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. अशातच नाशिकमधील शाळकरी मुलांचा एक हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

विद्यार्थ्यांनीच केलं मोबाईलमध्ये चित्रीकरण

नाशिकच्या सिडिओ मेरी विद्यालयातील शाळेच्या आवारात इयत्ता दहावीत शिकणारी मुलं एका अज्ञात कारणावरून भांडण करायला लागली आणि काही वेळातच यातील एकाचा राग अनावर झाल्यानं एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. दरम्यान, काही विद्यार्थी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करायचा सोडून बघ्याची भूमिका घेत आपल्या मोबाइलमध्ये घटनेचे चित्रीकरण करताना व्यस्त असल्याचं दिसून आलं आहे.

हाणामारीत मुलांचे कपडे देखील फाटले

पंचवटी परिसरातील सीडीओ मेरी शाळेतील हे दोघे विद्यार्थी आहेत. शाळेबाहेरच काल दुपारी त्यांच्यात सिने स्टाईल हाणामारी झाली. यात एका मुलाचे कपडे देखील फाटले. हा सर्व प्रकार बघत इतर मुले आनंद घेत होती. दरम्यान, या घटनेबाबत शाळा प्रशासनाला आम्ही विचारणा केली असता या विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावण्यात येऊन समज देण्यात आली असून, पुन्हा ते असे कृत्य करणार नाही असे आश्वासन पालकांकडून शाळेला मिळाले आहे. एकीकडे शहरात वाढत असलेली गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असताना आता लहान मुलांमध्ये देखील अशाप्रकारे हाणामाऱ्या होऊ लागल्याने शहरातील पालकवर्ग आणखीनच दहशतीखाली आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.