ETV Bharat / city

.... आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते - छगन भुजबळ - छगन भुजबळ यांची सरकारवर टीका

राज्यात भाजप सरकार येण्या अगोदर, 'खिशात पैसे नेले की पोत्यात सामान येत होते.. आता मात्र पोत्यात पैसा नेला तर खिशात सामान येते' असे बोलत छगन भुजबळ यांनी महागाईवरून सरकारवर शेलक्या भाषेत टीका केली आहे.

छगन भुजबळ
author img

By

Published : Oct 11, 2019, 11:56 AM IST

Updated : Oct 11, 2019, 12:55 PM IST

नाशिक - सटाणा तालुक्यातील ताहराबाद येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील युती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी अशा प्रश्नांवर भुजबळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा... 'पवारांच्या घड्याळाचे बारा वाजल्याने कोणीही हाताला घड्याळ बांधायला तयार नाही'

भाजप निवडणूकीत मुळ मुद्द्यांना बगल देत आहे - भुजबळ

राज्यातील भाजप सरकार प्रचारा दरम्यान कलम 370, काश्मीर या मुद्द्यांना पुढे करत आहे. मात्र राज्यातील ज्या मुळ समस्या आहे, त्या मुद्द्यांना मात्र ते बगल देत भलत्याच मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत, अशी टीका भुजबळ यांनी यावेळी केली.

chhagan bhujbal
छगन भुजबळ

हेही वाचा... गेल्या पाच वर्षात भाजपने केवळ विविध धर्मांत तेढ निर्माण केली - अशोक चव्हाण

भुजबळांची राज्यातील महागाईवरून सरकारवर शेलक्या भाषेत टीका

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना लोकांचे जीवन सुलभ होते. मात्र विद्यमान सरकारच्या कार्यकाळात प्रचंड महागाई झाल्याने जनता भरडली जात आहे. राज्यात अगोदर खिशात पैसे नेले की पोते भरून सामान येत असे. आता मात्र पोतेभर पैसा नेला तरी खिशात येईल इतकेच सामान येते, असे बोलत भुजबळ यांनी महागाईवरून सरकारवर टीका केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण केवळ शरद पवारांना असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले.

हेही वाचा... शरद पवार तुम्हाला स्वस्थ बसू देणारच नाही - उध्दव ठाकरे

सरकारला करून दिली आश्वासनांची आठवण

ताहराबाद येथील सभेत बोलताना भुजबळ यांनी भाजप सरकारने 2014 ला सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचला. राम मंदिर, प्रत्येकाच्या खात्यात १५लाख रुपये, काळे धन, शिव स्मारक, रोजगार आदी मुद्यांचा सरकारला सोईस्कर विसर पडला असून, कुठे आहेत 'अच्छे दिन' असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

Intro:नाशिक/सटाणा
जयवंत खैरनार
सटाणा तालुक्यातील ताहराबाद येथे झालेल्या प्रचार सभेत माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या कामगिरीवर चौफेर टीका केली. Body:भाजपा सरकार राज्यातील मूळ मुद्द्यांना व प्रश्नांना बगल देत कलम ३७० व काश्मीर एवढ्याच मुद्यांवर निवडणुका लढवीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतांना जीवन जगणे सुलभ होते. मात्र विद्यमान सरकारच्या कार्यकाळात प्रचंड महागाई झाल्याने जनता भरडली जात आहे. आधी खिशात पैसे नेले की पोत्यात सामान यायचे आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते अशी खोचक टिका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण केवळ शरद पवारांना असल्याचे भुजबळ म्हणाले.Conclusion:राम मंदिर, प्रत्येकी खात्यात १५लाख रुपये, काळे धन, शिव स्मारक, रोजगार आदी मुद्यांचा सरकारला सोईस्क विसर पडला असून, कुठे आहेत "अच्छे दिन" असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.
Last Updated : Oct 11, 2019, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.