ETV Bharat / city

Har Ghar Tiranga: तिरंगा ध्वजासोबत तिरंगा फेटा, टोपी, ओढणी नाशिकच्या बाजारात दाखल

तिरंगा ध्वज खरेदी करण्यासोबत नाशिकमध्ये तिरंगा फेटा, टोपी, ओढणी, स्टिकर आदी वस्तूंना नागरिकांची मोठी मागणी आहे. यामुळे यंदा नाशिकमध्ये देशाचा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा होणार आहे. आमच्याकडे ध्वजासोबत महिलांसाठी तिरंगा रंगात ओढणी, डोक्याला लावायची क्लिप, गजरा, टी-शर्ट तर पुरुषांसाठी फेटा, मफ्लर, कॅप, स्टिकर, टी-शर्ट आदी वस्तू उपलब्ध मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत.

तिरंगा ध्वजासोबत तिरंगा फेटा,
तिरंगा ध्वजासोबत तिरंगा फेटा,
author img

By

Published : Aug 9, 2022, 9:56 PM IST

Updated : Aug 9, 2022, 10:28 PM IST

नाशिक - देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. तिरंगा ध्वज खरेदी करण्यासोबत नाशिकमध्ये तिरंगा फेटा, टोपी, ओढणी, स्टिकर आदी वस्तूंना नागरिकांची मोठी मागणी आहे. यामुळे यंदा नाशिकमध्ये देशाचा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा होणार आहे. आमच्याकडे ध्वजासोबत महिलांसाठी तिरंगा रंगात ओढणी, डोक्याला लावायची क्लिप, गजरा, टी-शर्ट तर पुरुषांसाठी फेटा, मफ्लर, कॅप, स्टिकर, टी-शर्ट आदी वस्तू उपलब्ध असून याला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय अशी माहिती दुकानदार पारस लोहाडे यांनी दिली.

व्हिडिओ

7 लाख 50 हजार घरांवर तिरंगा फडकणार - देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले असून, शासन पातळीवर देखील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात तिरंगा प्रकल्प संकल्प हर घर तिरंगा उपक्रमासाठी 7 लाख 50 हजार घरांवर तिरंगा फडकवण्याचे संकल्प असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले. यासाठी शाळा महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे. शाळा व महाविद्यालय स्तरावर हरघर तिरंगा उपक्रमाबाबत चर्चासत्र स्पर्धा शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मांडली आहे.

तिरंगा ध्वजासोबत तिरंगा फेटा
तिरंगा ध्वजासोबत तिरंगा फेटा

नियोजन करण्याच्या सूचना - नाशिक जिल्ह्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेऊन त्या दृष्टीने स्थानिक विक्रेते व पुरवठादार यांच्याशी संपर्क करून तिरंगा झेंडा खरेदी बाबत नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील महिला बचत गटांनासुद्धा याबाबत प्रशिक्षण देऊन तिरंगा झेंडा निर्मिती करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांनी दिल्या आहेत.

75 फूट उंच ध्वजस्तंभ - नाशिक जिल्ह्यातील पाच शासकीय कार्यालयांत 75 फूट उंच ध्वजस्तंभ उभारून तिरंगा फडकवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचे काम सुरू असून (10 ऑगस्ट)पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच निफाड तहसील कार्यालय, कळवण, मालेगाव येथे पंचायत समिती कार्यालयात हा 75 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असून तेथेही युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे.

हेही वाचा - Indian Independence Day: 'हे' आहेत 26/11 चे खरे हिरो! वाचा सविस्तर

Last Updated : Aug 9, 2022, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.