ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट : नाशिकमध्ये अडकले सुमारे 500 मालवाहतूक ट्रक; चालकांना लागलीये घराची ओढ - ट्रक

गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबापासून दूर असल्याने या सर्वांना आता त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची ओढ लागली आहे, असी प्रतिक्रिया ट्रक चालकांनी दिली आहे. तर सरकारनेदेखील पुढाकार घेऊन ट्रक चालकांना मदत करावी असे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे म्हटले आहे.

trucks are stuck in nashik city due to corona lockdown
लॉकडाऊनमुळे नाशिक शहरात सुमारे 500 मालवाहतुक ट्रक अडकले
author img

By

Published : Apr 8, 2020, 5:38 PM IST

नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला आहे. राज्य सरकारनेदेखील जिल्हा बंदी केली आहे. याचा परिमाण वाहतूक व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे एकट्या नाशिक शहरात महाराष्ट्र राज्यासोबतच अन्य राज्यातून आलेले जवळपास 400 ते 500 ट्रक अडकून पडले आहेत.

लॉकडाऊनमुळे नाशिक शहरात सुमारे 500 मालवाहतूक ट्रक अडकले

काही दिवसांपूर्वी ट्रकचा हा आकडा 700 ते 800 इतका होता. मात्र, अत्यावश्यक सेवा देण्यासाठी अनेक ट्रक शहराच्या बाहेर गेले आहेत. तरीही अद्याप मोठ्या प्रमाणात ट्रक आणि त्याचे चालक नाशिकमध्ये आहे. मागील अनेक दिवसांपासून शहरात अडकून पडल्याने ट्रक चालक आणी त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि विविध समाजसेवी संस्था, संघटनांकडून जेवण दिले जात आहे.

हेही वाचा... WarAgainstCorona; 'कोरोना' युद्धासाठी भारतीय सैन्याला मैदानात उतरण्याची वेळ आलीये...

एकाच ठिकाणी होणारी ट्रकचालकांची गर्दी टाळण्यासाठी त्यांना 15 दिवस पुरेल एवढा किराणा देण्यात आला आहे. यात तांदूळ, डाळ, तेल, मसाले, साबण यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबापासून दूर असल्याने या सर्वांना आता त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची ओढ लागली आहे, असी प्रतिक्रिया ट्रक चालकांनी दिली आहे. तर सरकारने देखील पुढाकार घेऊन ट्रक चालकांना मदत करावी असे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.