मुंबई : शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे ( Yuvasenas Chief Aditya Thackeray ) यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा तिसरा टप्पा ( Aditya Thackerays Shiv Samvad Yatra ) ९ आणि १० ऑगस्ट रोजी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीण येथे आयोजित करण्यात आला होता; मात्र प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला आहे ( Aditya Thackerays Nashik Jalgaon visit cancelled ) . लवकरच हा टप्पा पूर्ण केला जाईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आली.
शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्पा लांबणीवर- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिंदे गटाला साथ दिली. आमदार शिंदे गटासोबत गेले असले तरी पदाधिकारी शिवसेनेसोबत कायम आहेत. जळगाव मधील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मातोश्रीवर भेट दिली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी जळगाव, पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक, सिन्नर आणि भिवंडी ग्रामीणमध्ये दोन दिवसांचा शिव संवाद यात्रा आयोजित केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांची प्रकृती खराब असल्यामुळे तिसरा टप्पा दौरा पुढे करण्यात आला आहे. त्यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी जळगांव, मालेगांव, नाशिक, आणि भिवंडीकरांना दिलगिरी व्यक्त केली असून लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे सांगितले आहे.
असा होता तिसरा टप्पा -
९ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.३० वाजता - पाचोरा येथे शिव संवाद यात्रा
दुपारी ०१.४५ वाजता - धरणगाव (जळगाव ग्रामीण) येथे शिव संवाद
दुपारी ०३.०० वाजता - पारोळा (एरंडोल) येथे शिव संवाद
सायंकाळी ०४.३० वाजता - धुळे येथे स्वागत
सायंकाळी ०६.०० वाजता - मालेगाव येथे शिव संवाद
१० ऑगस्ट २०२२ -
दुपारी १२.३० वाजता - सिन्नर येथे शिव संवाद
सायंकाळी ४.१५ वाजता - आंबाडी (भिवंडी ग्रामीण) येथे संवाद