ETV Bharat / city

नाशिकमधील भंगार बाजार अतिक्रमणावर होणार कारवाई - nashik municipal corporation

नाशिकमधील बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजार हटाव मोहीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वर्षभरापूर्वीच कारवाई झालेल्या भंगार व्यवसायिकांनी पुन्हा एकदा त्याच जागेवर अनधिकृतपणे व्यवसाय थाटला आहे. भंगार बाजाराला उच्च न्यायालयाने देखील अनधिकृत ठरवले असले तरी या परिसरात अनधिकृतपणे भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी पालिकेवर दबाव आणण्यासाठी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

भंगार बाजार अतिक्रमणावर होणार कारवाई
author img

By

Published : Aug 28, 2019, 11:54 PM IST

नाशिक- राज्यभर गाजलेले भंगार बाजार अतिक्रमण पुन्हा एकदा वादात सापडले आहे. भंगार व्यावसायिकांनी या जागेवर पुन्हा अतिक्रमण केले आहे. तर पालिकेने या अतिक्रमणावर पुन्हा कारवाई करण्याची नोटीस दिली आहे.

कारवाईबाबत बोलताना याचिकाकर्ते दिलीप दातीर

नाशिकमधील बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजार हटाव मोहीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वर्षभरापूर्वी पालिकेने हजारो पोलिसांच्या मदतीने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक अंबड लिंक परिसरातील अनधिकृतपणे उभारलेले भंगार व्यावसायिकांचे शेड जमीनदोस्त केले होते. मात्र काही महिने उलटत नाही तोच व्यवसायिकांनी पुन्हा एकदा त्याच जागेवर अनधिकृतपणे व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे या अतिक्रमणाविरोधात न्यायालयात लढा देणारे नगरसेवक दिलीप दातीर यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भंगार मार्केट तातडीने हटविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान गेल्या वर्षभरापूर्वी अंबड लिंक रोडवरील भंगार बाजार हटविण्याससाठी पोलिसांकडून हजारो पोलिसांचा बंदोबस्त देण्यात येवून तब्बल 8 दिवस ही कारवाई करण्यात आली होती. मात्र पालिकेच्या उदासिनतेमुळे याच जागेवर या भंगार व्यावसायिकानी बस्तान मांडल्याने पोलीसही हतबल झाले आहेत. तर पालिका प्रशासन आगामी गणेशोउत्सवानंतर कारवाईवर ठाम आहे.

भंगार बाजाराला उच्च न्यायालयाने देखील अनधिकृत ठरवले आहे. असे असले तरी या परिसरात अनधिकृतपणे भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी पालिकेवर दबाव आणण्यासाठी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भंगार व्यावसायिकांचा हा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून न्यायालयाचा अवमान करणाऱ्या अशा मोर्चेकऱ्यांना पोलीस परवानगी देताच कसे असा सवालही नाशिककर उपस्थित करत आहेत. त्यामुळे आता राज्यभर गाजलेल्या नाशिकमधील भंगार व्यावसायिकांच्या अनधिकृत दुकानांवर पालिका प्रशासन कारवाई करणार का? की भंगार व्यावसायिकांच्या मोर्चाच्या दबावाला बळी पडणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:राज्यभर गाजलेलं नाशिक मधील भंगार बाजार अतिक्रमण पुन्हा एकदा वादात सापडला आहे. भंगार व्यावसायिकांनी या जागेवर पुन्हा अतिक्रमण केले आहे तर पालिकेने या अतिक्रमनावर पुन्हा कारवाई करण्याची नोटीस दिली आहे.
Body:नाशिक मधील बहुचर्चित अनाधीकृत भंगार बाजार हटाव मोहीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.वर्षभरापूर्वी पालिकेने हजारो पोलिसांच्या मदतीनं उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक अंबड लिंक परिसरातील अनाधिकृतपणे उभारणीने भंगार व्यावसायिकांचे शेड जमीनदोस्त केले होते मात्र या कारवाईत काही महिने उलटत नाही तोच व्यवसायिकांनी पुन्हा एकदा त्याच जागेवर अनधिकृतपणे व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे या अतिक्रमण विरोधात न्यायालयात लढा देणारे नगरसेवक दिलीप दातीर यांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भंगार मार्केट तातडीने हटविण्याची मागणी केली आहे.

बाईप- (1)दिलीप दातिर - याचिकाकर्तेConclusion:तर दुसरीकडे गेल्या वर्षभरापूर्वी अंबड लिंक रोड वरील भंगार बाजार हटविण्यास साठी पोलिसांकडून हजारों पोलिसांचा बंदोबस्त देण्यात येवून तब्बल 8 दिवस ही कारिवाई करण्यात आली होती.मात्र पालिकेच्या उदासिनते मुळे याच जागेवर या भंगार व्यावसायिकानी बस्तान मांडल्याने पोलिसही हतबल झाले आहे.तर पालिका प्रशांसन आगमी गणेशोउत्सवा नंतर कारवाईवर ठाम आहे .

बाईट- (2)राधाकृष्ण गमे - आयुक्त नाशिक मनपा

भंगार बाजाराला उच्च न्यायालयाने देखील अनधिकृत ठरवले आहे असं असलं तरी या परिसरात अनधिकृतपणे भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी पालिकेवर दबाव आणण्यासाठी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय.भांगार व्यावसायिकांचा हा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून न्यायालयाचा अवमान करणाऱ्या अशा मोर्चेकरयांना पोलीस परवानगी देताच कसे असा सवालही नाशिककर उपस्थित करत आहे त्यामुळे आता राज्यभर गाजलेल्या नाशिक मधील भंगार व्यावसायिकांच्या अनाधिकृत दुकानांवर पालिका प्रशासन कारवाई करणार का ? की भंगार व्यावसायिकांच्या मोर्चाच्या दबावाला बळी पडणार ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.