ETV Bharat / city

Nashik Bus Fire Accident: नाशिक बस अपघात; होरपळून मृत्यू झालेल्या 12 पैकी 3 जणांची अद्याप ओळख पटली नाही - 3 जणांची अद्याप ओळख पटली नाही

Nashik Bus Fire Accident: यवतमाळ हुन मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या Chintamani Travels Company लक्झरी बसने (7 ऑक्टोबर) पहाटे गुजरात होऊन कोळसा वाहून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने बसला आग Bus caught fire due bursting diesel tank लागून यात 12 प्रवाशांच्या बसमध्येच होरपळून मृत्यू झाला.

Nashik Bus Fire Accident
Nashik Bus Fire Accident
author img

By

Published : Oct 11, 2022, 8:35 PM IST

नाशिक यवतमाळ हुन मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या Chintamani Travels Company लक्झरी बसने (7 ऑक्टोबर) पहाटे गुजरात होऊन कोळसा वाहून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या धडकेत ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने बसला आग Bus caught fire due bursting diesel tank लागून यात 12 प्रवाशांच्या बसमध्येच होरपळून मृत्यू झाला. आतापर्यंत 12 पैकी 9 मृतांची ओळख पटवण्यात आली असून अद्याप 3 मृतांची ओळख पटलेली नाही.

ओळख पटलेले मृतदेह लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर, अजय शंकर कुचनकर, उद्धव पंढरी भिलंग, कल्याणी आकाश मुधोळकर, साहिल जितेंद्र चंद्रशेखर, ब्रम्हादत्त सोमाजी मनवार, वैभव वामन बिलिंग,अशोक सोपान बनसोडे, सुरेश लक्ष्मण मुळे यांची ओळख पटली असून अद्याप 3 मृतदेहांची ओळख पटली नाही.

2 लाख रुपये जाळून खाक उद्धव भिलंग आणि वैभव भिलंग हे चुलते पुतणे वाशिम हून नाशिकला जुनी गाडी विकत घेण्यासाठी बसमधून प्रवास करत होते. गाडी घेण्यासाठी त्यांनी दोन लाखाची रोकड सोबत घेतली होती. बस अपघातात दोघांचाही मृत्यू झाला असून यात 2 लाखाची रोकडे जळून खाक झाली असून त्यांचं गाडी घेण्याचं स्वप्न आहे अपूर्ण राहिल.

कसा झाला अपघात 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास यवतमाळ होऊन मुंबईच्या दिशेने निघालेली चिंतामण ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर आल्यानंतर सर्व्हिस रोड वरून गुजरात दिशेने सिन्नरकडे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. बसची धडक ट्रकच्या डिझेल टाकीला लागल्याने काही वेळातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली. यात बसमधील 48 प्रवाशांपैकी 12 प्रवाशांचा जळून जागीच मृत्यू झाला, तर 36 जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

अपघाताची चौकशी करा अपघात झालेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले आहे. अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक परवाने रद्द केले पाहिजे, खाजगी बस चालवणारे अनेक नियम पाळत नाही. तसेच वाहन वेळेवर पोहोचवण्यासाठी जोरात चालवतात, एकच वाहन चालक अनेक तास वाहने चालवत असल्याने अशा प्रकार घडत असतात. या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच या चौफुलीवर वारंवार अपघात होत असून या चौफुलीत दरम्यान स्पीडब्रेकर बसवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.