ETV Bharat / city

Manoj Pandey : नागपूरकर मनोज पांडे लष्करप्रमुख झाल्याचा आनंद.. बालपणीच्या मित्राने दिला आठवणींना उजाळा - मनोज पांडे पत्नी डॉ अर्चना साल्पेकर

देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून नागपूर येथील रहिवासी मनोज पांडे ( Army Chief Manoj Pandey From Nagpur ) यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल आता नागपुरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पांडे यांचे बालपणीचे मित्र दिलीप आठले ( Manoj Pandeys Friend From Nagpur ) यांनी पांडे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट..

नागपूरकर मनोज पांडे लष्करप्रमुख झाल्याचा आनंद.. बालपणीच्या मित्राने दिला आठवणींना उजाळा

author img

By

Published : Apr 19, 2022, 5:31 PM IST

नागपूर - भारताचे नवे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे ( Army Chief Manoj Pandey From Nagpur ) लहानपणापासूनच अभ्यासासह क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट होते. मित्रांच्या समुहात मात्र मनोज पांडे खोडकर म्हणून ओळखले जायचे अशीच त्यांची ओळख होती. मैत्री निभावणारे, हसत- खेळत राहणारे मित्र आज सैन्याच्या सर्वोच्च पादवर पोहचले, याचा आनंद असल्याचे बालमित्र आणि अगदी नर्सरी पासून गेली 57 वर्ष मैत्री कायम ठेवणारे दिलीप आठले ( Manoj Pandeys Friend From Nagpur ) सांगतात.

देशसेवेला घेतले वाहून : दिलीप आठले हे मनोज पांडे यांचे बालपणीचे मित्र आहे. मनोज पांडे यांचे नागपुरातील केंद्रीय विद्यालय ( Kendriy Vidyalaya Nagpur ) , वायुसेना नगरमधून शालेय शिक्षण झाले. 10 वी नंतर त्यांनी पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी ( National Defence Academy Pune ) 1978 मध्ये प्रवेश घेतला. 1981 मध्ये ते तेथून बाहेर पडले. वयाच्या विसाव्या वर्षी सैन्यात भरती होऊ देश सेवेला वाहून घेण्याचे काम मनोज पांडे यांनी केले.

नागपूरकर मनोज पांडे लष्करप्रमुख झाल्याचा आनंद.. बालपणीच्या मित्राने दिला आठवणींना उजाळा

वडील मनोसपचार तज्ज्ञ तर आई उद्घोषक : नागपुरातील अमरावती मार्गावर 'मनोदय' नावाचं अत्यंत साधे घर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचं आहे. या घरी मनोज पांडे यांचे वडील डॉ. चंद्रशेखर पांडे वास्तव्यास ( Army Chief Manoj Pandeys Father ) असतात. पण वयोमानामुळे त्यांची प्रकृती सध्या ठीक नसते.आजारपणमुळे ते बोलू शकत नाही. वयानुसासर त्यांना आठवणीस अडचण जाते. डॉक्टर चंद्रशेखर पांडे हे मानसोपचार तज्ञ होते. नागपूर विद्यापीठमध्ये मानसोपचार विभागात ते कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते नागपुरातच राहले. मनोज पांडे यांच्या मातोश्री स्व. प्रेमा पांडे ( Manoj Pandey Mother Prema Pandey ) आकाशवाणीमध्ये अनाऊन्सर होत्या. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचे लहान बंधू संकेत पांडे हे सुद्धा भारतीय सेनेमधून कर्नल पदावरून निवृत्त झाले आहेत. मनोज पांडे यांचा मुलगा आणि सून हे दोघेही भारतीय सैन्यामध्ये पायलट आहे. मनोज पांडे यांच्या पत्नी डॉ अर्चना साल्पेकर ( Manoj Pandey Wife Dr Archana Salpekar ) या नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालयातून ( Government Dental College Nagpur ) त्याकाळातील सुवर्णपदक विजेत्या आहेत.

विश्वास होताच : मनोज पांडे एके दिवशी सर्वोच्च पदावर पोहोचेल याबद्दल शंका नव्हतीच. तसेच ज्या पद्धतीने मनोज पांडे यांचा सैन्यातील पोस्टिंग अत्यंत आव्हानात्मक राहिल्या असून, त्यांचा लडाख आणि चीन सोबतच्या सीमेवरचा प्रचंड अनुभव व अभ्यास होता. ते पाहता मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख होतील, असा विश्वास आम्हा सर्व मित्रांना होताच अशी प्रतिक्रिया त्यांचे मित्र दिलीप आठले यांनी दिली आहे.

नागपूरशी आणि मित्राशी नाळ जुळुनच : मनोज पांडे उंच पदावर गेले असले तरी, अजूनही त्यांची नागपूर आणि महाराष्ट्राशी नाळ जोडलेली आहे. ते नागपूरात आले की, मित्रांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रत्येकाशी भेट शक्य नसली तरी चौकशी करतात कोण कुठे आणि कसा आहे ते. मनोज पांडे यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्य नवी उंची गाठेल आणि भारताची सुरक्षा आणखी भक्कम होईल, असा विश्वासही मनोज पांडे यांच्या बालमित्राने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे नवे लष्करप्रमुख होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.