ETV Bharat / city

कोरोनाचे नियम पाळत पुन्हा शाळेत गुंजला विद्यार्थ्यांचा आवाज

आजपासून (दि. 4 जाने.) नागपूर महापालिका शाळा सुरू झाल्या आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार असून शाळा सुरू झाल्याने शिक्षकही आनंदीत झाले आहेत.

शाळा
शाळा
author img

By

Published : Jan 4, 2021, 10:22 PM IST

Updated : Jan 4, 2021, 10:44 PM IST

नागपूर - मिशीन बिगीन अंतर्गत महापालिका क्षेत्रात शाळेचे दार विद्यार्थ्यांसाठी अखेर सोमवारपासून खुले झालेत. दीर्घ कालावधीपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिकवणी सुरू होती. नागपूर महानगर पालिका क्षेत्रात आजपासून ऑनलाइननतंर 29 शाळेत प्रत्यक्ष शिकवणीला सुरुवात झाली. यात शिक्षकांनी मुलांचे वेगळ्या पद्धतीने कोरोनाच्या नियमाची काळजी घेऊन स्वागत केले. यावेळी महापालिकेचे शिक्षण सभापती आणि शिक्षणाधिकारी यांनी शाळेना भेट देत आढावा घेतला.

कोरोनाचे नियम पाळत पुन्हा शाळेत गुंजला विद्यार्थ्यांचा आवाज

शहरातील जवळपास 29 शाळा आज (दि. 4 जाने.) विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या आहे. विवेकानंद हिंदी उच्च प्राथमिक शाळेत मुलांना कोरोनाच्या नियमाचे पालन करून प्रवेश देण्यात आला. त्यानंतर मुलांचे टाळ्या वाजवत स्वागत करण्यात आले. बऱ्याच महिन्यांनी मित्रांसोबत नाही पण सामाजिक अंतर ठेवत एका बाकावर एक बसून विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाला सुरवात झाली.

सेवानिवृत्त होण्याअगोदर शिकवायला मिळवल्याने आनंदच

मागील काही दिवसांपासून शाळा बंद आहे. ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याची वेळ शिक्षकांवर आली. कोरोनामुळे आलेले हे आव्हान पेलण्यात शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यात शाळा केव्हा सुरू होणार आणि एकदाचे शिक्षकांना अडचणी विचारणार असे काहीसे मुलांना वाटत होते. तसेच काहीसे अनेक शिक्षकांना वाटत होते. शेवटच्या महिन्यात काही दिवस का होईना ही संधी मिळाल्याने आनंद गगनात मवेनासा असल्याचे होण्याऱ्या शिक्षेकेला सुद्धा वाटत होते. पण, आदेश धडकले आणि आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे शिक्षिका ज्योत्स्ना काट्यारमल यांनी ईटीव्ही भारतशी बोलून दाखवले. तेच मुलांनीही प्रत्यक्ष शिकवणीचा आनंद अधिक असल्याचे बोलून दाखवले. ऑनलाइनमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. आता थेट समोर असल्याने सोपे जाईल यासाठी आनंद असल्याचे बोलून दाखवले.
15 जानेवारीनंतर मिळणार 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांना टॅब

मुलांना सामाजिक अंतर राखून, हात सॅनिटाईज करून, ऑक्सिजनचे प्रमाण, थर्मल स्कॅनिंग करून पन्नास टक्के उपस्थिती शासकीय नियमाचे पालन करून अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तस्के देण्यात आली आहे. लवकरच गणवेश दिले जाईल. 15 जानेवारीनंतर 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली. यावेळी शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर याही उपस्थित होत्या.

69 शिक्षक निघाले कोविड पॉझिटिव्ह

शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे पालिका प्रशासनाच्या आदेशानुसार शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी केली आहे. यामध्ये आतापर्यंत 4 शिक्षक आणि 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहे. तेच तर खासगी शाळांमधील 63 शिक्षक हे कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे एकूणच पालिका हद्दीतील एकूण 69 शिक्षक व कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचे मनपाकडून सांगण्यात येत आहे.

नियमाचे पालन करण्याचे आवाहन - पालिका आयुक्त

शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोनाच्या नियमाचे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापूर्वी संमतीपत्र असणे बंधनकारक आहे. मुलांना कोरोनाचा संसर्गाचा शक्यता पाहता त्या अनुषंगाणे पाऊले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा - औरंगाबाद नामांतरबाबत सरकारने जनभावनेचा आदर करावा - नाना पटोले

हेही वाचा - नागपूर शहरातील शाळांची पहिली घंटा वाजली; तब्बल १० महिन्यांनी शाळा सुरू

Last Updated : Jan 4, 2021, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.