ETV Bharat / city

आरपीआय उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाशी युती करण्याच्या प्रयत्नात - रामदास आठवले

author img

By

Published : Oct 17, 2021, 7:56 AM IST

Updated : Oct 17, 2021, 9:52 AM IST

रिपब्लीन पक्ष देशभरात वाढवण्याचे काम सुरू असून यूपीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशी युती करण्यासाठी लवकर शक्तिप्रदर्शन करून दलित मतदार असलेल्या जागा मागणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले.

रामदास आठवले
रामदास आठवले

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केंद्र सरकारवर केलेल्या टिकेला केंद्रीय राज्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उत्तर दिले असून आम्ही छापा टाकून काटा काढत नसून काटा काढून छापा टाकतो, असे म्हटले आहे. तसेच रिपब्लीन पक्ष देशभरात वाढवण्याचे काम सुरू असून यूपीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशी युती करण्यासाठी लवकर शक्तिप्रदर्शन करून दलित मतदार असलेल्या जागा मागणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया

'आम्हाला आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता' -

येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपासोबत युती करण्याच्या विचारात असल्याचे रामदास आठवले म्हणाले. यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. यूपीत 18 डिसेंबर रोजी रमाबाई मैदानावर एक लाख लोकांची रॅली काढून आम्ही आमच्या पक्षाची ताकद दाखवून देणार आहोत. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्याशीही युती संदर्भात चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आम्हाला आठ ते दहा जागा मिळण्याची शक्यता असून युती झाल्यास भाजपाला याचा फायदा होईल असेही ते म्हणाले.

निवडणूक पडण्यापेक्षा जिकण्यासाठी लढत आहोत -

सगळ्या जागेवर मायावती यांचा कबजा नाही, त्या आमचा नेत्या आहेत. बसपाने आमच्या जागेवर कब्जा केला आहे. रिपब्लिक पक्ष अगोदर होता. चारसिंगच्या सरकारमदज्ये 19 आमदार निवडणून आले होते. त्यामुळे किमान अर्ध्या जागा द्याव्या अशी आमची मागणी आहे. एकटे निवडणूक लढल्यास पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकी पडण्यासाठी लढण्यापेक्षा जिंकण्यासाठी लढावा असा आमचा विचार आहे पण अजूनही स्वतंत्र स्वबळावर लढण्याचा हा कुठला विचार नसून भाजपच्या सोबतच हे निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले.

'खड्डे बुजवा नाही तर...' -

महाविकास आघाडीचे सरकार आपसात आरोप कुरघोडी करून भांडत आहे. त्यांना जनतेच्या हिताचे देणे घेणे नाही. विकासाच्या कामात आग्रही भूमिका घेताना दिसून येत नाही आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहे. त्यामुळे हे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम राज्यसरकारने केले पाहिजे. अन्यथा हे सरकार खड्ड्यात पडल्या शिवाय राहणार नाही. केंद्रीय मंत्री नितीम गडकरी यांच्या विभागामार्गत राष्ट्रीय महामार्गाचा मोठा विकास होत आहे. ते म्हणतात आम्ही महाराष्ट्राचा बंगाल करू, असे म्हणत असेल तर आम्ही पुन्हा बंगाल महाराष्ट्र करू, असे म्हणत त्यांच्या खास शैलीत मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला हाणला.

'...त्याचा संबंध यूपीच्या निवडणुकीशी जोडू नका' -

कलम 370 हटवल्याने चांगले वातावरण निर्माण झाले आहे. पण आतांकी कारवाई करुन भारतीय जवान मारले जात आहे. श्रीनगरमध्ये विकासासाठी उद्योग निर्माण करणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. त्यामुळे गृहमंत्री अमितशहा म्हणाले की, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावी लागेल. त्याचा यूपीच्या निडणुकीशी काहीही संबंध नाही. वेळ आली तरी कारवाई करावी लागेल आणि पाकिस्तानला धडा शिकवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला असल्याचे आठवले म्हणाले.

हेही वाचा - कलम 370 हटल्याने काश्मीर घाटीत विकासाचे मार्ग खुले झाले - मोहन भागवत

Last Updated : Oct 17, 2021, 9:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.