नागपूर - राज्यात सध्याच्या घडीला केवळ कोरोनाच्या चौथ्या लाटेची चर्चा सुरू आहे. पण त्यात तथ्य नाही, राज्यात आजच्या घडीला केवळ 1950 रुग्ण आहे. जिथे महाराष्ट्राने 65 हजार केसेस रोज पाहिल्या आहेत, त्या तुलनेत 200 रुग्ण मिळणे हे फार काही काळजी करण्याची गरज नाही, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. ते नागपुरात रवी भवन येथे बोलत ( Rajesh Tope Nagpur Tour ) होते.
राज्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहेत. राजकीय सभा, लग्न समारंभ, मेळावे होत आहेत, लोक गर्दी करत असताना देखील अपेक्षित रुग्ण वाढ झालेली नसल्याने चौथ्या लाटेची सुतराम शक्यता दिसत नसल्याचेही राजेश टोपे म्हणाले. बुस्टर डोजबाबत केंद्राच्या सुचना आहेत, त्यानुसार बुस्टर डोज देत आहेत, ॲटीबिाडीजची टेस्ट करुन लोक बुस्टर बाब निर्णय घेत आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मतदार संघात दौरा - आरोग्यमंत्री आज नागपुरात दौऱ्यावर आहेत. काटोल मतदार संघात जाणार आहेत. कार्यकर्त्यांचे म्हणणे एकूण घेऊन सगळ्या पदाधिकरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. ग्रामीण भागात जाऊन काम केले पाहिजे असे पक्षश्रेष्ठींचे आदेश आहेत. पक्ष संघटन वाढीसाठी काम केले जात आहे. आज काटोलमध्ये जाऊन ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र विषय काम पूर्ण झाले. जिल्हा रुग्णालयाची इमारत झाली आहे. विदर्भाचे मुख्यालय म्हणून ते कसे लवकर कार्यान्वित होईल, यासाठी पाऊले उचलणार आहेत. तसेच डागा आणि मेटल हॉस्पिटलला भेट देणार असल्याचेही राजेश टोपे म्हणाले.
काटोल मतदार संघात जास्त मेहेरबान आहे का? यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, काटोल मतदार संघात विकास झाला पाहिजे. अनिल देशमुख हे वरिष्ठ मंत्री राहिले आहे. सलीलला जितकी जास्त मदत करता येईल, तितकी मदत करण्याचे काम सुरू आहे. अनिल देशमुख नसल्याने मतदार संघात विकासाला खीळ बसू नये, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे, असेही टोपे म्हणाले.
संभाजी राजेबद्दल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील - आम्ही सर्वच शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे आहेत. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत आदर आहे. त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यांचे पवार साहेब यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.
सेनेचे आमदाराचा निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप - निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप अमादर आशिष जयस्वाल यांनी राष्ट्रवादीवर आरोप केला आहे. आशिष जयस्वाल हे ज्येष्ठ आमदार आहेच. ते माझे मित्र आहेत, त्यांच्या मतदार संघात विकास झाला पाहिजे, ही महाविकास आघाडीची जवाबदारी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही टोपे म्हणाले.