ETV Bharat / city

Political crisis in Maharashtra : न्यायालयाचा निकाल सरकारच्या विरोधात गेला तर, पुन्हा भुकंप येऊ शकतो? - माजी मंत्री वडेट्टीवार - Political crisis in Maharashtra

सर्वोच्च न्यायालयाचा ( Supreme Court ) निर्णय घटनेनुसार, कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. येणाऱ्या निकालावर महाराष्ट्रसह देशाचे लक्ष आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबविला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर, पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप ( Political crisis in Maharashtra ) घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल हे आता सांगता येत नाही. असे, वक्तव्य राज्याचे माजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Former Rehabilitation Minister Vijay Vadettiwar ) यांनी केले आहे.

If the court verdict goes against the government, can there be another earthquake? - Former Minister Vadettiwar
न्यायालयाच्या निकाल सरकारच्या विरोधात गेला तर, पुन्हा भुकंप येऊ शकतो? - माजी मंत्री वडेट्टीवार
author img

By

Published : Jul 10, 2022, 7:48 PM IST

नागपूर - आमदारांच्या अपात्रतेबद्दल ( Regarding disqualification of MLA ) सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ( Supreme Court ) घटनेनुसार, कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. येणाऱ्या निकालावर महाराष्ट्रसह देशाचे लक्ष आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबविला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर, पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप ( Political crisis in Maharashtra ) घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल हे आता सांगता येत नाही. असे, वक्तव्य राज्याचे माजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Former Rehabilitation Minister Vijay Vadettiwar ) यांनी केले आहे. ते नागपुरात माध्यमांशी निवस्थानी बोलत होते. 92 नगर परिषदेच्या निवडणुका ( Municipal elections ) होऊ घातल्या आहे. आमचे सरकार असतांना इंपेरिकल डेटा हा बांठिया आयोगाने तयार केला आहे. यात 12 जुलैला सुनावणी आहे. आडनावावरून दुरूस्तीचे काम काम झाले. सुरवातीला आडनावारून नाव घेण्याचे काम सुरू होते. त्यात आठ दिवस दुरुस्ती करून घेण्यात आली. त्यासाठी डेटा तयार करण्यासाठी आठ दिवस विलंब झाला आहे. निवडणूक जाहीर झाल्याने यात निवडणुका थांबतील की नाही, माहीत नाही, पावसाळ्यात मतदान होऊ नये. तसेच ओबीसींच्या आरक्षणा शिवाय ( OBC reservation ) मतदान घेऊ नये असे विनंती या सरकारला केली आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.

शिंदे-भाजप सरकारवर विजय वेडेट्टीवार यांची पत्रकार परिषद

लोकांनी संभ्रम ठेवू नये - आम्ही काँग्रेसचे 11 आमदार बहुमत चाचणीला उशिरा पोहोचलो त्यामुळे चर्चेला पेव फुटला आहे. बहुमत चाचणीच्या दिवशी 9 मिनिट उशिरा पोहोचलो. आम्हाला वाटले होते की, आधी चर्चा होईल नंतर मतदान होईल. मात्र, आमची अनुपस्थिती लक्षात घेऊन लगेच पोल मागितला. आम्हाला जाणून हे करायचे असते तर आम्ही बहुमत चाचणीच्या दिवशी विधान भवनात गेलोच नसतो असाही खुलासा त्यांनी केला. कोणी ही आमच्या बद्दल संभ्रम ठेऊ नये. सत्तेतील लोकांकडे बहुमत असल्याने त्यामुळे आम्ही बहुमत चाचणीच्या दिवशी गेलो काय आणि नाही गेलो काय, निकालावर काही परिणाम होणार नव्हता असेही ते म्हणालेत.

हेही वाचा - Aaditya Thackeray : 'माझ्यावर उगाच खास प्रेम करण्याची...'; अपात्रतेच्या नोटीसीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

बांठिया आयोगाने मध्यप्रदेशच्या धर्तीवर डेटा गोळा केला - ओबीसीचा डेटा गोळा करण्यासाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर पद्धत वापरली गेली. तीच पद्धत आपण अवलंबिली आहे. त्यामुळे जर मध्यप्रदेशचे अहवाल सर्वोच्च न्यायालयात मान्य होत असेल तर महाराष्ट्राचे अहवाल ही मान्य होईल असे वडेट्टीवार म्हणाले. गोव्यातील काँग्रेसच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावर बोलतांना ते म्हणाले की, विरोधक असेल तरच लोकशाही शिल्लक राहील. त्यामुळे विरोधकांनी किमान विरोधक तरी शिल्लक ठेवावे अशी टिका त्यांनी भाजप-शिंदे गटावर केली.

ओबीसी जनजगृती यात्रा काढणार - येत्या ऑक्टोम्बर महिन्यांपासून ओबीसीं समाजाच्या प्रश्ननाना धरून ओबीसी जनजागरण यात्रा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अनेक प्रश्ननाना धरून ओबीसी लोकांमध्ये चळवळ निर्माण करण्याचे काम 30 जिल्ह्यात जाऊन जनजागृती यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी कोकणातून या यात्रेला सुरवात करणार आहे. ही जनजागृती पक्षाची नसल्याने अनेक ओबीसी संघटनांनी एकत्र यावे. असेही आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा - Nitin Gadkari on Judiciary : निर्णय देणे हा न्यायपालिकेचा अधिकार, त्यात कोणाचा हस्तक्षेप असू नये - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.