ETV Bharat / city

वेकोलीने कोळशाचे उत्पादन वाढवले असते तर आज तुटवडा नसता - गडकरी - वेकोली कोळसा नितीन गडकरी प्रतिक्रिया

वेकोलीने ( Nitin Gadkari comment on wcl ) कोळशाचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. प्रशासनाने 4-4 वर्षे फाईल, पत्र दाबून ठेवणे बंद करावे. जर असे झाले नसते तर सहा महिन्यांपूर्वीच कोळशाचे ( Wcl coal manufature ) उत्पादन वाढले असते आणि कोळशाचा तुटवडा जाणवला नसता. वेकोलीने स्वस्त कोळसा दिल्यामुळेच गरिबांना स्वस्त वीज मिळत आहे, असे गडकरी ( Nitin Gadkari comment on Coal manufature ) म्हणाले.

Coal Nitin Gadkari comment
वेकोली कोळसा निर्मिती गडकरी प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 17, 2022, 10:38 AM IST

Updated : Apr 18, 2022, 7:00 AM IST

नागपूर - वेकोलीने ( Nitin Gadkari comment on wcl ) कोळशाचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. प्रशासनाने 4-4 वर्षे फाईल, पत्र दाबून ठेवणे बंद करावे. जर असे झाले नसते तर सहा महिन्यांपूर्वीच कोळशाचे उत्पादन वाढले असते आणि कोळशाचा ( Wcl coal manufature ) तुटवडा जाणवला नसता. वेकोलीने स्वस्त कोळसा दिल्यामुळेच गरिबांना स्वस्त वीज मिळत आहे. मात्र, या कोळशात दगडही विकले जातात. नाशिक-कोराडीत प्रकल्पात दगड हे स्मारकाच्या स्वरुपात पाहायला मिळतात, असे टोलाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari comment on Coal manufature ) यांनी मारला. ते दिव्यांगासाठी साहित्य वाटप शिबिरात बोलत होते. वेकोलीच्या सीएसआर फंडातून साहित्य वाटप करण्यात आले.

माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हेही वाचा - Nana Patole Hanuman Chalisa Recitation : राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून सुरू; नाना पटोलेंचा निशाणा

वेस्टर्न कोल फिल्ड्सने आपल्या खाणींमधून युद्धस्तरावर काम करून सुमारे 20 दशलक्ष टन कोळसा उत्पादन वाढवणे आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. वेकोलीने वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा राखीव ठेवाला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी कोळसा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी खाणी सुरू केल्या पाहिजे. नुकतेच केंद्रीय ऊर्जामंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या कोळसा खाणी बंद आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहेत त्या कोळसा खाणी सुरू करण्यासाठी खाजगीकरणाचा वापर करून पाहावा, असे गडकरी म्हणाले. तसेच कोळशाची कॅलरीक व्हॅल्यू कमी असते, त्यामुळे ग्रेडेशन पद्धतीतील तपासणी दोष असल्याचेही गडकरी म्हणाले. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणालेत.

तर सिलेंडर 40 रुपयांनी स्वस्त होईल - अमोनियम नायट्रेटचा तुटवडा आपल्या देशात आहे. वेकोलीने अमोनियम नायट्रेट व मिथेनचे उत्पादन करण्याची परवानगी द्यावी. यासोबतच डीएमई बनविले तर घरगुती वापरासाठीच्या गॅसमध्ये ते मिसळल्यास 30 ते 40 रुपयांनी सिलेंडर स्वस्त होईल आणि गरिबांना याचा फायदा होईल.

तर स्वस्त रेती मिळेल - तसेच, खाणींमधून निघालेल्या मातीतून रेती वेगळी करण्याचे तंत्रज्ञान आणेल आहे. या मातीतून वाळू वेगळी केल्यास ती स्वस्त किमतीत गरिबांना उपलब्ध होईल. पण, महाराष्ट्र सरकारचा कायदा म्हणते स्वस्तात विकू नका. रेती माफियांच्या फायद्यासाठी तो कायदा असू शकतो. जर यातून मिळणाऱ्या वाळूचे दर कमी झाले तर या रेती घाटांवरील दुकानदाराऱ्या बंद होईल. अनेक राजकीय नेते या रेतीघाटांवर भिडून आहे, असा टोलाही गडकरी यांनी नेत्यांना लागावला.

सीएसआर फंडातून दिव्यांगांसाठी 2 कोटींपेक्षा अधिक रक्कम आतापर्यंत खर्च केली असल्याचे सांगून आतापर्यंत 1 हजार 600 पेक्षा अधिक दिव्यांगांना लाभ मिळाला आहे. आजही 687 लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा - धक्कादायक; भंगार कारच्या डिक्कीत आढळला अज्ञात तरुणाचा नग्न मृतदेह, शहरात खळबळ

Last Updated : Apr 18, 2022, 7:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.