नागपूर - राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे साध्य विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. विदर्भात पक्षमजबुती आणि आगामी निवडणुका पाहता हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या सत्ता बदल किंवा परिवर्तन होऊ शकते. पण त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ते पत्रकारांशी सिंचन भवनात बोलत होते.
विविध बाबींवर चर्चा
जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांची आढाव बैठक सिंचन भवन नागपूर येथे घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील कन्हान वळण योजना यासह अन्य काही बाबींवर चर्चा करून प्रकल्पना गती देण्याचे संदर्भात प्रयत्न केले जाईल, असे ते म्हणाले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख्य यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत परिवर्तन झाले मनपात होईल?
यावेळी ते म्हणाले, की नागपूर महापालिकेतही परिवर्तन होऊ शकते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिले. परिवर्तन घडवून आले. ते नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे म्हणाले. पण कोणी म्हटले आपलाच पक्ष फार मोठा आणि महत्त्वाचा आहे, असे गृहीत धरले तर काही अडचणी तयार होतील, असेही ते म्हणायला विसरले नाही.
'स्थानिक पदाधिकऱ्यांचा म्हणण्याला अधिक महत्त्व असते'
राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे घटक आहे, मित्रपक्ष असल्याने सल्ला मसलत करून घेऊन निर्णय घेतले जातात. यात राष्ट्रवादीने स्थानिक पदाधिकारी वेगळे लढण्याचे सुचवले. या प्रश्नावर उत्तर देताना नामदार जयंत पाटील म्हणाले, की स्थानिक लोक हे निवडणूक लढतात. यामुळे त्यांच्या म्हणण्याला अधिक महत्त्व असते. ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी त्यांना विश्वासात घेऊन योग्य ते पक्षहिताचे निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले.