ETV Bharat / city

MLC Election Result 2021 : 'हा तर भाजपाचा नैतिक पराभव...'; नाना पटोलेंचा भाजपवर पलटवार - विधानपरिषद निवडणूक निकाल

विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला आपल्या उमेद्वारांवर विश्वास नसून भाजपाने ही निवडणूक (Nagpur MLC Election) घोडेबाजार करून जिंकली असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole On MLC Election Result) यांनी केला आहे.

Nana Patole statement On BJPs Win
Nana Patole statement On BJPs Win
author img

By

Published : Dec 14, 2021, 4:03 PM IST

Updated : Dec 14, 2021, 4:14 PM IST

नागपूर - विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला (Nagpur MLC Election Result 2021) आहे. विदर्भातील दोन्ही जागा भाजपाच्या पदरात पडल्या आहेत. मात्र, भाजपाने ही निवडणूक (Nagpur MLC Election) घोडेबाजार करून जिंकली असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole On MLC Election Result) यांनी केला आहे.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया
  • काय म्हणले नाना पटोले -

भाजपाला आपल्याच प्रतिनिधींवर विश्वास नसल्याने त्यांना आपले नगरसेवक सहलीकरीता पाठवावे लागले होते. आमच्या सायकलवर फिरणाऱ्या उमेदवाराने भाजपाला 'सळो की पळो' करून सोडले, हाच भाजपाचा मानसिक पराभव असल्याचे नाना पटोले म्हणाले. या निवडणुकीत आमच्याकडे विजयासाठी लागणारी 90 मते कमी होती. तरीदेखील निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो. भाजपाकडे संख्याबळ असतानादेखील त्यांना आपल्या मतदारांची पळवापळवी करावी लागली. भाजपाने घोडेबाजार करूनच ही निवडणूक जिंकली आहे. तरी देखील निकालाचे आम्ही स्वागत करू, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

हेही वाचा - MLC Election Result 2021 : नागपूरसह अकोल्यातही भाजपचा विजय, काँग्रेसची मतं फुटली

  • 'भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज' -

घोडेबाजार करून भाजपाने ही निवडणूक जिंकली असली तरी हा त्यांचा नैतिक पराभव आहे. जिल्हा परिषद, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यासह ज्यामध्ये नागरिकांकडून मतदान केलं जातं, त्या अनेक निवडणूका काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. केवळ ५६० मतांच्या निवडणुकीत घोडेबाजार करून भाजपाने ही निवडणूक जिंकली असली, तरी त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा सल्ला नाना पटोले यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला आहे.

हेही वाचा - MLC Election Result 2021 : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

  • 'छोटू भोयरला केवळ १ मत, भाजपाने हाणला टोला' -

काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांना उमेदवारी देऊन राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐन वेळी काँग्रेसने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी देऊन भोयर यांचा अपमान केला. त्यामुळे छोटू भोयर यांनी काँग्रेसला मतदान न करता स्वतःलाच मतदान केले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला हाणला आहे. काँग्रेसचा उमेदवारच त्यांना मत देत नसल्याचे ते म्हणाले आहेत. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिउत्तर दिले आहे. हे मतदान गुप्त असतानादेखील अशा प्रकारे कुणी कुणाला मत दिले, हे उघड करणे चुकीचे आहे. भाजपाचा लोकशाहीवर विश्वास नसल्याने यावर फार बोलण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - Pravin Darekar Criticized MVA : महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांवरून जनतेचा विश्वास उडाला : प्रवीण दरेकर

Last Updated : Dec 14, 2021, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.