ETV Bharat / city

Chess Day Special News : चुका दूर करत, यशाला गवसणी घालताना अपयश पचवावे लागते- ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता - Nagpur

Grandmaster Sankalp Gupta : खेळ असो की आयुष्य यात चढ- उतार येत असतो. त्यामुळे चुका दूर करत यशाला गवसणी घालताना अपयश पचवावेच लागते, असाच मूलमंत्र ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता देत आहे. नागपूरकचा संकल्पने ( Chess player Sankalp Gupta ) 18 व्या वर्षात 71 व्या ग्रँडमास्टर होण्याचा किताब पटकवला होता.

ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता
ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता
author img

By

Published : Jul 20, 2022, 10:05 AM IST

नागपूर - कुठल्याही खेळात आवड असणे गरजेचे आहे. कारण आवड असली, तरच त्या खेळात आपण टिकून राहू शकतो. कारण खेळ असो की आयुष्य यात चढ- उतार येत असतो. त्यामुळे चुका दूर करत यशाला गवसणी घालताना अपयश पचवावेच लागते, असाच मूलमंत्र ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता देत आहेत. ( Chess player Sankalp Gupta ) संकल्प गुप्ता हा मूळचा नागपूरकर संकल्पने अठराव्या वर्षात 71 व्या ग्रँडमास्टर होण्याचा किताब पटकवला आहे.

संकल्प गुप्ताने आईसोबत चेस खेळत आपला प्रवास सुरु केला. वयाच्या चौथ्या वर्षीपासून त्याने बुद्धिबळ खेळात पारितोषिक मिळवायला सुरवात केली. तेच वयाच्या 18 व्या वर्षी एलो रेटिंग मिळवत 2021 मध्ये सरबियात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ग्रँडमास्टर हा किताब मिळवला आहे. ( Grandmaster Sankalp Gupta ) 3 जीएम नॉर्म पूर्ण करत त्याने 2 हजार 504 वर येलो रेटिंग मिळवले आहे. त्याने या स्पर्धेत 6.5 गुणांसह 2 स्थान मिळवले आहे. पुढेही खेळत राहण्याचा संकल्प आहेच.

ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता
ग्रँडमास्टर संकल्प गुप्ता
खेळातील एकाग्रतेचा फायदा अभ्यासातही झाला - संकल्पला हा काही 1-2 दिवसांच्या प्रयत्नाने नाही, तर अनके वर्ष सातत्य टिकवून ठेवत त्याने यश मिळवले आहे. हे गुण मिळवताना त्याने स्वतः च्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही, किंवा होऊही दिले नाही. 10 वी वर्गात त्याने तब्बल 91 टक्के गुण मिळवले आहे. त्यामुळे बुद्धिबळ खेळतांना लागणार फोकस याचा फायदा अभ्यास सुद्धा झाल्याचा संकल्प सांगत आहे. 5-5 तास बुद्धिबळ खेळत सराव करत होता. या सरावातून तो तरबेज होत गेला.पुढचा वेध घेण्याची कला अवगत होते - बुद्धिबळ खेळताना प्रत्येक चाल ही पुढील अनेक चालीचा आराखडा बांधून खेळावी लागते. त्यामुळे या रणनितीचा फायदा खऱ्या जीवनात जगताना झाला. यातून व्यक्तिमत्व घडताना फायदा झाला. एक चाल खेळताना खेळातुन लक्ष भरकटले, तरी यशाचे रूपांतर अपयशात होते. त्यामुळे प्रत्येकवेळी एक रणनीती ठरवून चाल खेळावी लागते. ( Grandmaster Sankalp Gupta ) त्यात काय झालं तर, काय करावे असेही एका मागून एक प्लॅन नियोजनबद्ध पद्धतीने होते. खेळाच्या यशात असो, की सामान्य जीवन जगताना यश मिळवताना अनुशासन महत्वाचे असते. त्यामुळे त्याचे नियम बनून अपयश दूर ठेवावे लागते. अपयशातून शिकून आपला यशाचा पुढचा पल्ला गाठावा लागतो. अनुभवातून खेळ समृद्ध केला - स्पर्धा म्हटले की यश- अपयश आलेच. या सगळ्यात काही ठिकाणी दुसरा तर काही- काही स्पर्धेत तिसरा तर कुठे अपयश आले. अनेकदा तो हरला तासोनतास खेळत होता. तसा तासोनतास तो रडत बसत होता. याच अनुभवातून समृद्ध होत गेला. हरवून थांबण्यापेक्षा त्याने अधिक जिद्दीने स्पर्धेत सहभागी होण्याचे होत, चुका दुरुस्त करत अधिक वेळ चेस खेळत राहायचा. ( Chess player Sankalp Gupta ) यासाठी रोज सराव आणि सातत्य जपत ग्रँडमास्टर होण्यासाठी खेळत गेला. ते स्वप्न आता त्याचे पूर्ण झाले आहे, पण सुपर ग्रँडमास्टर होण्याचा 'संकल्प' बांधला आहे.दिव्या 13 व्या वर्ष शिवछत्रपती, तर 15 व्या वर्षी ग्रँडमास्टर - संकल्प सांगतो की बुद्धिबळ असो, की कुठलाही खेळ आयुष्यात तुम्हाला स्वताचे व्यक्तीमत्व घडवताना समाजातील एक नागरिक म्हणून खुप काही शिकवून जातो. या पद्धतीने नागपुरातील दिव्या देशमुख हिने सुद्धा, बुद्धिबळ खेळत असतांना स्वतः ला वयाच्या 13 व्या वर्षी मनाचा समजला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवला. तेच वयाच्या 15 व्या वर्षी ती ग्रँडमास्टर झाली. तिने 2305 ऍलो रेटिंग मिळवलं असून तिची यशवंतराव होण्याचा प्रवास सुरु आहे. त्यामुळे तिला ग्रँडमास्टर होण्याचा आनंद मिळाला असल्याने कुटुंबियांना आनंदीत आहेत. पुढे तिला खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
दिव्या देशमुख
दिव्या देशमुख
करियर घडवण्यासाठी बुद्धिबळ फायद्याचे - बुद्धिबळ हा खेळ राहिला नसून आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे. बुद्धिबळात जसे 'चेकमेट' होते. तशीच आयुष्यातही घडत असते, असे संकल्प गुप्ता सांगतो. त्यामुळे बुद्धिबळ खेळात करियर घडवण्याच्या सुद्धा संधी आहेत. अनेक प्रशिक्षक होणे, स्वतः खेळणे, इतरांना घडवणे यासोबत अनेक संधी करियर म्हणून सुद्धा उपलब्ध होत आहे.

हेही वाचा - Lok Sabha Speaker Approves Shinde Group : लोकसभा अध्यक्षांची शिंदे गटाला मान्यता; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.