नागपूर - वादाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी मिळून कुख्यात गुंडाची हत्या केली. ही घटना नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आकाश मोरे असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. विक्की उर्फ विशाल नागेंद्र आणि रोहित बहादुर सिंग लहेरी उर्फ देशमुख अशी आरोपींची नावे आहेत.
गुंडाच्या हत्येनंतर दोन्ही आरोपी पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली आहे. विक्की उर्फ विशाल नागेंद्र आणि रोहित बहादुर सिंग लहेरी उर्फ देशमुख या दोघांना गुंड आकाशने वस्तीतील लोकांच्या समक्ष मारहाण केली होती.
हेही वाचा-आयपीएलवर सट्टा: हायप्रोफाईल सोसायटीतून 3 क्रिकेट बुकींना अटक; 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वस्तीतील लोकांच्या समोर मारहाण केल्याने अपमानित झालेल्या दोघांमध्ये संतापाची भावना होती. त्यांनी आकाशचा गेम करण्याची प्लॅनिंग केली. अवघ्या २४ तासात आकाश त्यांना दारूच्या नशेत गवसला. दोघांनी मिळून आकाशवर धारदार हत्याराने वार केले. त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. या घटनेत गुंड आकाश मोरेचा मृत्यू झाला. दोन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
हेही वाचा-नाशिक : ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर अत्याचार, आरोपी गजाआड
मृत आणि आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचे-
हत्या प्रकरणातील मृत आकाश मोरे आणि विक्की या दोघांवर दुखापत करून लुटणे, जुगार भरवणे या सारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. ते दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याचे कळमना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा-अल्पवयीन मुलीला पळवून नेत विविध ठिकाणी अत्याचार, शेजारी राहणारा आरोपी अटकेत